ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कर्तृत्वाचा "सकाळ' तर्फे गौरव 

live
live

नाशिक : माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जाहिर करण्यात आलेल्या व प्रथमच साजरा करण्यात आलेल्या वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त "सकाळ'तर्फे सातपुर कार्यालयात कार्यक्रम आयोजित केला होता.

सोमवारी (ता.15) आयोजित या कार्यक्रमात ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कतृत्वाची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले. विक्रेत्यांच्या समस्यांची सोडवणूक करतांना त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. 

कार्यक्रमात "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने, युनीट व्यवस्थापक राजेश पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ विक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी नाशिक शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पवार, सिडको वृत्तपत्र विक्रेता सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष दत्ता ठाकरे, उपाध्यक्ष अजय बागूल, नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवा भावी संस्थेचे उपाध्यक्ष महेश कुलथे, सातपुर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष विनोद कोर आदी उपस्थित होते. सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन ज्येष्ठ विक्रेत्यांचा सन्मान करण्यात आला. 

"सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने म्हणाले, की वाचकांपर्यंत वृत्तपत्र पोहचविण्यात अथ्थक परीश्रम घेणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या तोलामोलाच्या कामाचा आज गौरव होत आहे. प्रथमच साजरा होत असलेल्या या दिनानिमित्त प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार केले जात असून प्रत्येक विक्रेत्यांची भुमिका महत्वाचीच आहे. विक्रेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य, शिक्षणासाठी व्यापक कार्य करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com