बनावट साठेखतावरून बॅंकेची 44 लाखांची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

नाशिक : गृहकर्जासाठी बनावट साठेखत व खरेदी खत खरे असल्याचे भासवून वकील महिलेसह सहा जणांनी बॅंक ऑफ इंडियाला तब्बल 44 लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
  शिवाजी उद्यान परिसरातील बॅंक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी नवीन पारस भारती (रा. गोविंदनगर) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित धनंजय रोहिदास पगार, सौ. विजयश्री धनंजय पगार, कविता विश्‍वास थोरात, विश्‍वास वसंत थोरात, कविता शरद पगार, ऍड. इंद्रायणी सहानी या सहा संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, संशयितांनी संगनमताने 21 डिसेंबर 2012 ते 23 जानेवारी 2013 पर्यंत शिवाजी उद्यानाजवळील बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत गृह कर्जासाठी बनावट साठेखत व खरेदी खत दिले. त्या बनावट कागदपत्रांच्या आधारे संशयितांनी दोन कर्ज प्रकरणे मंजुरीसाठी बॅंकेला दिले. तसेच, त्यांनी बॅंकेला खोटा सर्च रिपोर्टही दिला.

 संशयितांच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे बॅंकेने दोन गृहकर्ज मंजूर केले आणि दोन्ही खात्यावरील प्रत्येकी 22 लाख रुपये याप्रमाणे 44 लाख रुपये मंजूर करून बॅंकेची फसवणूक केली. बॅंक व्यवस्थापनाच्या निदर्शनास सदरची बाब आल्यावर त्यांनी चौकशी केली. त्या पडताळणीत सहा संशयितांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, सरकारवाडा पोलीसात संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: marathi news sale deed fraud