नाशिकमध्ये गुरुवारी संविधान बचाओ-भारत बचाओ रॅली

residentional photo
residentional photo

नाशिक: समाजात द्वेष पसरिवला जात असून त्यास सरकारचे प्रोत्साहन आहे. देशात कोठेही शांतता नाही, देशाची वाटचाल अराजकतेकडे सुरू आहे. सरकार लोकशाहीची हत्या करीत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी महिला विभागाकडून 'संविधान बचाओ .. देश बचाओ'चा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग आहे. गुरूवारी (.२३)सकाळी अकराला संविधान बचाओ भारत बचाओ रॅली काढण्यात येणार आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ,अजित पवार,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा माजी मंत्री फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, आ. विद्या चव्हाण, माजी खासदार समीर भुजबळ, यांच्यासह प्रमुख महिला पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.

सरकारच्या विरोधात सर्व समाज रस्त्यावर येत आहे. सरकारकडे कोणत्याही प्रश्नांचे समाधानकारक उत्तर नाही. नोटाबंदी व विविध निर्णयामुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. माहिलांवरील अत्याचारातही वाढ झाली आहे. लोकशाहाची कोणताही स्तंभ सुरक्षित नाही. सरकार गुंडगिरीलाच शाब्बासकी देत आहे. यांचा विरोध करण्यासाठी 'संविधान बचाओ.. भारत बचाओ' हा कार्यक्रम देशभर घेतला जात आहे.

या कार्यक्रमाची  सुरवात दिल्ली येथून झाली असून त्यानंतर मुंबई, नागपूर  येथे आंदोलन करण्यात आले आहे. आता राज्यात सर्व ठिकाणी हा कार्यक्रम घेऊन मनुस्मृती व इव्हीएम मशिनची होळी केली जात आहे. कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com