स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण मोहिम उद्यापासून,दहा ग्रामपंचायतींचा समावेश 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

नाशिक : केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयातर्फे महापालिका क्षेत्राप्रमाणेच ग्रामीण भागातही स्वच्छ सर्वेक्षण राबविले जाणार आहे. बुधवार (ता. 1)पासून या मोहिमेला सुरवात होईल. यात जिल्ह्यातील कोणत्याही दहा ग्रामपंचायतींची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक ग्रामपंचायतीस सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 1 ते 31 ऑगस्टपर्यंत हे सर्वेक्षण केले जाणार आहे. 

या मोहिमेत प्रामुख्याने शाळा, अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, आठवडे बाजार, धार्मिक स्थळ या ठिकाणी सर्वेक्षण केले जाईल. या सर्वेक्षणांतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांची स्वच्छतेविषयक प्रत्यक्ष तसेच ऑनलाइन प्रतिक्रिया नोंदवली जाईल. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत प्रत्येकी तीन ते चार गावांचे सरपंच, स्वच्छताग्रही, ग्रामपंचायत सदस्य, देखरेख समिती सदस्य, अंगणवाडीसेविका, आशा सेविका, शिक्षकांच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण केले जाणार आहे. प्रत्येकी सात ते आठ गावांमध्ये सामान्य नागरिक तसेच सामूहिक बैठकांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जाईल. 

अशी ठरणार जिल्ह्याची क्रमवारी 
उत्तम गुणवत्तापूर्ण कामगिरी केलेल्या जिल्ह्यांची क्रमवारी ठरवली जाईल. त्यासाठी मंत्रालयाने एकात्मक व्यवस्थापन माहिती प्रणाली विकसित केली आहे. या माध्यामातून 35 टक्के प्रत्यक्ष स्थानिक नागरिकांची प्रतिक्रिया, 35 टक्के उपयोगात येणाऱ्या सेवांची प्रगती, 30 टक्के प्रत्यक्ष पाहणी केली जाईल. 
स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण 2018 अंतर्गत स्वच्छतेसाठी निवडलेली गावे हागणदारीमुक्त गावांची स्थिती, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आठवडे बाजार, धार्मिक ठिकाणी स्वच्छतागृहाची पाहणी, स्वच्छता, वापरात आहे की नाही, कचऱ्यांचे व्यवस्थापन, पाण्याची उपलब्धता, परिसर स्वच्छता आदींची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल. अभियानाबाबत नागरिकांमध्ये असलेली जागरूकता जाणून घेतली जाणार आहे. 
 
Web Title: Marathi news swatch serve expedition

टॅग्स