'निपाह"'टाळण्यासाठी सावधानता,वराह पालनावर नजर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

केरळ राज्यात "निपाह' या झुनोटीक विषाणुजन्य रोगाचा संसर्गामुळे मृतांचा आकडा वाढतं असतांना त्यापार्श्‍वभूमीवर महापालिका क्षेत्रात वराह मालकांना पालिकेतर्फे नोटीसा पाठविण्यात आल्या  आहे. निर्जनस्थळी वराह पालन करावे, अन्यथा त्यांच्यावर बारीक नजर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उघड्यावर वराहांना फिरू देवू नका असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

केरळ राज्यात "निपाह' या झुनोटीक विषाणुजन्य रोगाचा संसर्गामुळे मृतांचा आकडा वाढतं असतांना त्यापार्श्‍वभूमीवर महापालिका क्षेत्रात वराह मालकांना पालिकेतर्फे नोटीसा पाठविण्यात आल्या  आहे. निर्जनस्थळी वराह पालन करावे, अन्यथा त्यांच्यावर बारीक नजर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उघड्यावर वराहांना फिरू देवू नका असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

  केरळ राज्यात निपाह आजारांचे रुग्ण वाढतं आहे. त्यामुळे राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने महापालिकेला स्पष्ट सूचना दिल्या आहेत. निपाह रोगाचा प्रसार वटवाघुळाची विष्ठा, लाळ व मुत्राद्वारे वराहांना होतो. बाधित वराहांच्या संपर्कात आल्यास लोगाची लागण होण्याची शक्‍यता असते त्यामुळे पालिकेच्या वतीने काळजीचा भाग म्हणून वराह पालन पोषण करणाऱ्या नागरिकांना सुचना देण्यात आल्या आहेत.

  मुख्यत्वे पंचवटीतील फुले नगर, देवळाली गाव, विहीतगाव, टाकळी, नाशिकरोड, वडाळागाव या भागात मोठ्या प्रमाणात वराहांचे पालन होते. विभागिय अधिकायांमार्फत वराह जेथे मनुष्याचा संबंध येणार नाही अशा ठिकाणी हलविण्याच्या सुचना दिल्या जाणार आहे.  

चार गोठे धारकांना नोटीसा 
"निपाह' च्या पार्श्‍वभूमीवर गोठ्यांची देखील तपासणी मोहिम हाती घेण्यात आली असून वडाळा रोड वरील भारत, जलाल, खोत तसेच सांजू हाजी डेअरी या गोठे मालकांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. गोठ्यांची स्वच्छता करा अन्यथा जनावरे जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे. 

वराहांचे पन्नास नमुने घेणार 
राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने विशेष खबरदारी घेण्यासाठी काही सुचना केल्या आहेत. त्यात तातडीने निपाह रोगाचे सर्वेक्षण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून डुकरांचे पन्नास रक्तजल नमुने रोग अन्वेषण विभागाकडे पाठविण्याच्या सुचना दिल्या आहेत. वटवाघुळांच्या मुत्र, लाळ व विष्ठेच्या संपर्कात मोकाट वराह येणार नाही याची खबरदारी घ्यावी, संशय बाधित वहारांचे निदान होण्यासाठी तत्काळ उपाय योजना करावी व मानवाशी संपर्क येणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. निपाह सदृश्‍य रोग लक्षणाने मृत डुकरांचे कोणत्याही परिस्थितीत स्थानिक स्तरावर शवविच्छेदन करू नये अशा सुचना देण्यात आल्या आहेत. 
 

Web Title: marathi news varah palan