तीर्थयात्रेसाठी शंभर वारकऱ्याचे विमानोड्डाण

residentional photo
residentional photo

इगतपुरी ः महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध संत जगतगुरु तुकाराम महाराज यांचा सदेह वैकुंठप्रवास विमानाने झाल्याचे मानले जाते. विविध सांप्रदायिक यात्रांना पायी दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून जाणाऱ्या वारकरी बांधवांसाठी विमानप्रवास तशी दुर्मिळच. अशा स्थितीत वारकरी परंपरेचा झेंडा हाती घेऊन इगतपुरी तालुक्यातील 100 पेक्षा जास्त वारकरी बद्रीनाथ,केदारनाथ सह उत्तरखंड यात्रेसाठी विमानाने उद्या प्रस्थान करीत आहेत.

विमानाचे चाक सुद्धा आयुष्यात कधीही न पाहिलेले 100 वारकरी प्रत्यक्ष विमानाने प्रवास करणार असल्याने इगतपुरी तालुक्यात कौतुक सुरू आहे. बद्रीनाथ धाम येथे अखंड हरिनाम सप्ताह आणि अन्य ठिकाणी देवदर्शन करून वारकरी परतीचा प्रवास करणार आहेत.

त्र्यंबकेश्वर, देहू, आळंदी, पंढरपूर आदी तिर्थक्षेत्रांना निष्ठावान वारकरी नेहमीच पायी दिंडी काढून जातात. विमानात बसून फिरण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र प्रत्येकाचे हे स्वप्न पूर्णत्वाकडे जात नाही. वयोवृद्ध वारकऱ्यांना विमानात बसण्याचे ध्येय शेवटपर्यंत पूर्ण होत नाही. नेमकी हीच बाब हेरून मुंढेगाव ता. इगतपुरी येथील श्री विठ्ठल रुख्मिणी यात्रा कंपनीने 100 पेक्षा जास्त वयोवृद्ध वारकऱ्यांना विमानात बसवून तीर्थाटन करण्याची दुर्मिळ संधी उपलब्ध करून दिली आहे. 

उद्या दि. 27 ला इगतपुरी तालुक्यातील हे वारकरी मुंबई ते दिल्ली असा प्रवास प्रथमच विमानाने करणार आहेत. त्यांनतर पुढील प्रवासात हरिद्वार, ऋषिकेश, बद्रीनाथ, केदारनाथ, उत्तराखंड, दोन धाम असे तीर्थाटन करण्यात येईल. ह्या काळात बद्रीनाथ धाम येथे भव्य प्रमाणात होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहात सर्व वारकरी सहभागी होणार आहेत. मुंढेगाव येथील हभप मनोहर गतीर, धनंजय गतीर, भरत गतीर, मारुती गतीर, लक्ष्मण गतीर, रामदास गतीर, शत्रुघ्न गतीर, रंधव गतीर ह्यांनी उपक्रमाचे आयोजन केले आहे. 

कोट
सामान्य वारकऱ्यांना विमानप्रवास दुर्मिळ असतो ही बाब हेरून दरवर्षी वृद्ध वारकऱ्यांना ही संधी देणार आहोत. पांडुरंग परमात्मा आणि संतांचे विचार अन्य राज्यात नेण्यासाठी आमचा हा उपक्रम आहे. 
- ह.भ.प. भरत महाराज गतीर, आयोजक. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com