तहसिल आवारातून वाहन पळाविलेल्या  चौघांविरोधात गुन्हा दाखल 

rent
rent

नाशिकः नाशिक तहसिल कार्यालयाने जप्त केलेली वाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून गायब केल्याप्रकरणी अखेर पाच दिवसानंतर गुन्हा दाखल झाला 
आहे. तहसिल कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरुन सरकारवाडा पोलिसात काल रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला. 

नाशिक शहर व तालुक्‍यातील अवैध पणे आढळणाऱ्या वाळू साठ्यांचा शोध घेत संबधित वाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील तहसिल कार्यालयात जमा केली 
जातात. अशी काही वाहन 12 फेब्रूवारीला तहसिल कार्यालयात जमा करण्यात आली होती. मात्र त्यापैकी खडी असलेला ट्रक (एमएच 04 एफक्‍यु 4082), खडीचा दुसरा 
ट्रक (एमएच 04 एफडी 8703) आणि (एचएच 15 डीके 6331) असे महसूल विभागाच्या भरारी पथकाने जप्त करुन पंचनामे केलेले ट्रक संबधितांनी दंड न भरताच परस्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

तहसिल कार्यालयातील अरुण देवबा शेळके (वय 33) यांच्या तक्रारीवरुन अंबादास भागवत सदगीर (शिंदेगाव ता.नाशिक), सुरेश चंदर भोईर, दत्ता मुरलीधर माने आणि भरत मोतीराम नवले (सारुळ ता.नाशिक) अशा चौघांविरोधात सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. ट्रक मधील प्रत्येकी 2 लाख 7 हजाराचा ऐवज ऐवजासह ट्रक गायब केल्याप्रकरणी एकंदर 6 लाख 22 हजाराचा ऐवज पंचनाम्यानंतर परस्पर गायब केल्याचे तक्रारीत 
म्हटले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सारिका आहिरराव तपास करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com