मातोश्रीच्या आजारपणामुळे मुंढेचे वॉक विथ कमिशनर रद्द,आता पुढील शनिवारी

live photo
live photo

नाशिक : धडाकेबाज निर्णयामुळे नाशिककरांसाठी हिरो ठरलेले महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एनएमसी ई-कनेक्‍ट ऍपवर नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याची सोय उपलब्ध करून दिली असतानाचं थेट जनतेच्या दरबारात जाऊन तक्रारींची सोडविण्याच्या उद्देशाने "वॉक विथ कमिशनर' उपक्रम सुरु केला.  मुंढे यांच्या मातोश्रींची प्रकृति बिघडल्याने आजचा कार्यक्रम रद्द करावा लागला. आयुक्त मुंढे यांनी काही वेळ हजेरी लावून अडचण सांगताना तक्रारदार नागरिकांना नाराज न करता पुढील शनिवारी पुन्हा त्याच जागेवर उपक्रम आयोजित करण्यात आल्याची घोषणा केली.

टोकन पध्दतीने प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत दिवसभरात त्या सोडविण्याचे आश्‍वासन देण्यात आले. 
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाच्या जॉगिंग ट्रॅकवर आज नेहमीपेक्षा वेगळे वातावरण भल्या पहाटे दिसून आले. प्रकृतीची काळजी कशी घ्यावी येथ पासून ते देशभरातील हॉट विषयावर चर्चा होणाऱ्या ट्रॅकवर आज शहरातील तक्रारींची जुळवाजुळव करण्याचीचं घाई दिसून येत होती. ट्रॅकवर रोजच्या पेक्षा वेगळे दिसणारे वेगळे चेहरे व झाडून उपस्थित असलेले पालिकेचे सर्व अधिकारी त्यामुळे प्रत्येकाचे कुतूहूल वाढले होते. त्याला कारणही तसेच होते.

  आतापर्यंत नवी मुंबईत होणारा वॉक विथ कमिशनर हा उपक्रम आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने नाशिक मध्ये सुरु करण्याची घोषणा करण्यात आली होती व कान्हेरे मैदानावरील जॉगिंग ट्रॅकवरून आजपासून त्याचा प्रारंभ होणार होता. पालिका आयुक्त पदाची सुत्रे स्विकारल्यापासून तुकाराम मुंढे यांनी धडाकेबाज कामगिरी बजावली आहे. कामकाजात सुधारणा करण्याबरोबरचं कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर निलंबन व बडतर्फीची देखील कारवाई करण्यात आली आहे. पालिकेच्या खर्चातील बचत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आदी कारणांमुळे पालिकेच्या कामकाजाला गती मिळाली आहे. त्यामुळे मुंढे यांच्या वॉक विथ कमिशनर उपक्रमात सहभाग घेताना ते काय आश्‍वासने देतात याबाबत सर्वांची उत्सुकता वाढलेली दिसली. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com