live photo
live photo

दर्जेदार सुविधा हव्या,चांगले नागरीक बना,मुंढेनी साधला नरमाईने संवाद

नाशिक : प्रत्येक प्रश्‍नाला महापालिका हेच उत्तर असू शकत नाही. चांगल्या देखरेखीसाठी शहरातील सर्व जॉगिंग ट्रॅक, उद्यानांमध्ये सुरक्षारक्षक नेमाणे हा काही पर्याय होऊ शकत नाही. जर नागरीक महापालिकेकडून दर्जेदार सुविधांची अपेक्षा करत असतील, तर त्यांनी चांगले नागरीकही बनले पाहिजे. आपल्या जबाबदाऱ्ऱ्यांही लक्षात घेतल्या पाहिजे, असा सल्ला महापालिका आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी आज कृषीनगर जॉगिंग ट्रॅक येथे झालेल्या "वॉक विथ कमिशनर' उपक्रमातून दिला.  आयुक्‍त मुंढे यांची भूमिका आज नरमाईची होती. काही नागरीकांना  त्यांनी त्वज्ञानाचा काढा पाजला

. आज प्राप्त झालेल्या तक्रारींचा निपटारा येत्या आठ दिवसांत केला जाईल, असे आश्‍वासनही आयुक्‍तांनी दिले. "वॉक विथ कमिशनर'च्या यंदाच्या तिसऱ्या उपक्रमातही नागरीकांनी सहभागी होत तक्रारी मांडल्या. यात प्रामुख्याने जॉगिंग ट्रॅकची स्वच्छता, उद्याने-ट्रॅकबाहेर होणारी अतिक्रमणे, मोगळ्या भुखंडांमुळे होणारी अस्वच्छता, प्रश्‍न इथंपासून वाहनांचा वेग नियंत्रणात आणण्यासाठी गतिरोधकाची मागणी करणाऱ्या अर्जांचा समावेश होता. प्राप्त झालेल्या 38 तक्रारींवर चर्चा करतांना आयुक्‍त मुंढे यांनी नागरीकांना ऐनवेळी आपले प्रश्‍न मांडण्याची संधी दिली. 

रामदास कॉलनीतील पाणी पुरवठा प्रश्‍न, क. का. वाघ संस्थेसमोरील अनधिकृत नळजोडणीचा प्रश्‍न यावेळी मागण्यांत आला. गंगापूररोड, कॉलेजरोड परीसरातील हॉटेल व्यावसायिकांकडून पार्किंगच्या जागी टेबल टाकून व्यवसाय केला जात असल्याचीही तक्रार होती. जॉगिंग ट्रॅकवर पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या मुद्यावरुनही सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही स्वरूपाच्या सुचना मांडण्यात आल्या. पंचवटी पेठरोडवरील समाज मंदिराचा अनधिकृत वापर होत असल्याचे एका तक्रारदाराने मांडले. नंदीनी नदीवरील नासर्डी पुलाजवळीत मांस विक्रेत्याविषयी एकाने आक्षेप घेतला. तर सराफ बाजारातील जंगम यांच्यामुळे वाहतुकीस अडथळ होत असल्याचे एका तक्रारीत नमुद केले होते. 

पार्किंग सोबतच स्टेडियमला 
राष्ट्रीय दर्जा देण्याचा प्रयत्न 

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे पार्किंग उभारण्याच्या प्रस्तावाची अपूर्ण माहिती असतांना काहींकडून विरोध केला जातो आहे. स्टेडियमचा काही भाग पार्किंगसाठी वापरला जाणार असून, यानिमित्त स्टेडियमला राष्ट्रीय स्तराचे बनविण्याचा प्रयत्न आहे. तेथे इनडोअर गेम्स खेळले जातील, अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे श्री. मुंढे यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी स्टेडियम ऐवजी नेहरू उद्यानाच्या जागेत वाहनतळ उभारण्यासाठी एका नागरीकाने केलेल्या तक्रारीवर त्यांनी माहिती देतांना, जर आपल्याला नको असेल तर स्टेडियमच्या जागी पार्किंगचा प्रस्ताव रद्द करू, असे त्यांनी सांगितले. 


..तर खंडणीचा गुन्हा दाखल करा 
अंबड येथील खुल्या भुखंडाच्या जागी भरविल्या जाणाऱ्या भाजी बाजाराविषयी एकाने आक्षेप घेतला. सदरचे ठिकाणी टिप्पर गॅंगचे उगमस्थान असून जागा वैयक्‍तिक मालकीची असल्याचे भासवत तसे फलक लावण्यात आलेले आहे. तसेच भाजी विक्रेत्यांकडून पैसे उकळले जात असल्याचे तक्रारीत नमुद होते. यावर या प्रकरणाची चौकशी करत जर पैश्‍याची मागणी होत असेल, तर संबंधितांवर खंडणीचा गुन्हा दाखल करावा, अशा सुचना आयुक्‍तांनी दिल्या. 

गतिरोधक असल्याचा फलकच काढून टाकू 
कृषी नगर जॉगिंग ट्रॅक लगतच्या रस्त्यावर भरधाव वाहनांमुळे अपघात होत असून गेल्या तीन वर्षांपासून गतिरोधकासाठी पाठपुरावा करत असल्याचे गाऱ्हाणे नागरीकाने मांडले. पुढे गतिरोधक आहे, असे सुचना फलक रस्त्यावर लावलेले आहे, परंतु अद्यापही गतिरोधक टाकण्यात आले नसल्याचे तक्रारदाराचे म्हणणे होते. यावर सदरच्या ठिकाणी गतिरोधक टाकणार नसल्याचे आयुक्‍त मुंढे यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील रिजनल ट्रान्सपोर्ट अथॉरिटी (आरटीए) यांना गतिरोधक टाकण्यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार असून त्यांची सुचना प्राप्त झाल्यास तातडीने गतिरोधक टाकू, सद्य स्थितीत गतिरोधक असल्याची सूचना देणारा फलक काढून टाकू, असे आयुक्‍तांनी सांगितले. 


उद्यानांसमोर पे ऍण्ड पार्किंग करणार 
जॉगिंग ट्रॅक, उद्यानांबाहेर वाहनतळाचा प्रश्‍न गंभीर असल्याची समस्या नागरीकाने मांडली. यावर आयुक्‍त म्हणाले, की प्रत्येक उद्यानासामोर मार्किंग करत तेथे पे ऍण्ड पार्क तत्वावर वाहनतळ उपलब्ध करून दिले जाईल. प्रत्येक सुविधा काही फुकट मिळणार नाही, नागरीकांना त्यासाठी काहीतरी मोजावेदेखील लागेल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com