निफाडचा  साडेतीनशे वर्षाचा फणसे वाडा मोजतोय अखेरची घटका.

आनंद बोरा
सोमवार, 30 जुलै 2018

नाशिकः  फणसे वाडा....निफाडमधील एक जुना आणि इतिहासाची साक्ष देणारा वाडा...आज तो शेवटची घटका  मोजत आहे. वाड्याचा दरवाजा व माडीवरील एक खोली अजूनही आहे . या खोली मध्ये सरदार यशवंतराव फणसे यांची दुर्मिळ फोटो आणि जुन्या पेंटिंग आहे.  या वास्तूचे जतन होणे आवश्यक असून अहिल्याबाई होळकरांच्या मुलीचे आठवे वारसदार नानासाहेब होळकर हे आज या वाड्याची देखभाल करत आहे.
     
या वाड्याविषयी इतिहास  जाणून घेण्यासाठी  त्यांच्याशी निफाड येथे जावून संवाद साधला ८० वर्षाचे नानासाहेब वाड्याविषयी बोलू लागतात...हा वाडा साडेतीनशे वर्ष जुना असून अहिल्याबाई होळकर यांची मुलगी मुक्ताबाई यांचा विवाह सरदार यशवंतराव फणसे यांच्याशी झाल्यावर अहिल्याबाई होळकरांच्या मुलीचे  तिसरे वंशज गणपतराव यांना नाण्याबाई हि मुलगी झाली.. मुलगा न  झाल्याने त्याच जहागीरदार बनल्या व त्यांना  निफाड,,लासलगाव,सोनेवाडी,चांदवड मधील शिवरे बोऱ्हाके,जुन्नर मधील मडके जांब,या पाच गावांची पाटीलकी त्यांना देण्यात आली.
     
या वाड्याची निर्मिती केली गेली. हा वाडा निफाड गावामध्ये आहे. आता तेथे एक व्यायामशाळा सुरु असून इतिहास अभ्यासक वाड्याला भेटी देवून माहिती घेत असतात. त्यांच्याकडे  आज हि दोन जुने ताम्रपट बघावयास मिळतात या वाड्याची आठवान म्हणून त्यांच्या कडे दोन तलवारी आणि वाघाच्या कातड्याची पुरातन भंडारी आहे  जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात तात्यासाहेब होळकर या वयातही  भंडारी घालून एका झटक्यात लंगर तोडतात अन ती कडी तब्बल तीस फुट उंच उडते हे विशेष...

पौराणिक वस्तूंचे अनोखे जतन
 फणसे सरदार असल्याने त्यांना पाच तलवारी ठेवण्याचा अधिकार दिला त्यामुळे या त्यांच्या कडे आहे.. याचे कागदपत्र मारतंडराव होळकर यांनी इंदूरला आर्म मुक्तीयार खंडेराव बरकडे यांच्याकडे दिले. १९६५-६६ मध्ये बरकडे यांना मुक्तीयार पदावरून कमी केले पण याने कागदपत्रे हजार केले नसल्याने होळकर कुटुंबाला मिळणारा अलाऊन्स बंद झाला. कोर्टा मध्ये केस चालू असल्याचे नानासाहेब सांगतात  निफाड मधील हा वाडा शेवटची घटका मोजत आहे याच्या संवर्धनासाठी पुढे येणे आवश्यक आहे दुर्मिळ चित्रांचे संवर्धन होणे आवश्यक आहे 

Web Title: marathi nws fanse wada at niphad

टॅग्स