#MarathiKrantiMorcha आंदोलनाचे मनमाड शहरात तीव्र पडसाद

manmad
manmad

मनमाड- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभर होत असलेल्या आंदोलनाचे मनमाड शहरात तीव्र पडसाद उमटले शहर सकल मराठा समाजातर्फे आज पुकारण्यात आलेले मनमाड कडकडीत बंद होते मोर्चा, रास्तारोको, मुख्यमंत्र्यांचा पुतळा दहन, रेल रोको करण्याचा प्रयत्न, टॉवरवर चढून आंदोलन, डोक्याचे मुंडन, सरकारविरुद्ध घोषणाबाजी करत तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन दिले एसटी सेवाही बंद होती पोलिसांचा चोख बंदोबस्त होता 

 मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी आता मूळ धरू लागली असून राज्यभर तिचे उमटणारे तीव्र पडसाद आज मनमाड शहरातही दिसून आले बंदच्या पूर्वसंध्येला शहर सकल मराठा समाजातर्फे काकासाहेब शिंदे यांच्या नावाने एक वृक्ष लावून श्रद्धांजली वाहत बंदची हाक दिली होती त्यानुसार आज मनमाड शहरात सर्वांनीच उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला बंदमुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट होता सकल मराठा समाजातर्फे शहरातून मोर्चा काढण्यात आला हातात भगवे ध्वज घेऊन तरुणही सहभागी होते मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे कोण म्हणतं घेणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता मोठ्या संख्यने मराठा समाज बांधव, भगिनी मोर्चात आंदोलनात सहभागी झाले होते रेल्वे पुलाजवळ मोर्चा आला असता मनमाड-येवला महामार्ग सुमारे दीड तास रोखून धरत रास्तारोको आंदोलन केले या रास्तारोकोमुळे दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडी  झाली होती यावेळी विविध वक्त्यांची भाषणे झाली कितीही तीव्र आंदोलन करण्याची वेळ  अली तरी आम्ही आंदोलन करू आरक्षण आम्हाला मिळालेच पाहिजे मुख्यमंत्री फडणवीस मराठा समाजाची दिशाभूल करत आहे शिंदेंचा बळी व्यर्थ जाणार नाही आरक्षण घेऊनच राहू राज्यभर आंदोलन होत आहे पण सत्तेतील आणि विरोधातील १४५  मराठा आमदार गप्प आहे पंढरपूरमध्ये साप सोडण्याचा कांगावा खोटा आहे कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळाले पाहिले आदी मत विविध वक्त्यांनी व्यक्त केले यावेळी भीमराज लोखंडे आणि विष्णू चव्हाण या आंदोलनकर्त्यांनी मार्गाच्या बाजूलाच असलेल्या बीएसएनएलच्या टॉवरवर चढून तर विठ्ठल नलावडे यांनी डोक्याचे मुंडन करत मुख्यमंत्र्यांचा निषेध केला रास्तारोको सुरू असतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले सकल मराठा समाजातर्फे विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार अवळकंठे यांना देण्यात आले यानंतर संतप्त झालेल्या काही आंदोलनकर्त्यांनी हातात ध्वज घेऊन सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत रेल्वेस्थानकाच्या दिशेने धाव घेतली रेल्वेमार्गाकडे घुसत असतांना रेल्वे पोलीस, सुरक्षा बालाच्या जवानांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र संतप्त झालेल्या जमावाने त्यांना बाजूला सारत रेल्वेमार्गामध्ये उभे राहून घोषणाबाजी केली मात्र ज्या रेल्वे मार्गावर आंदोलक उभे होते तेथून एक भरधाव वेगात मालगाडी येत होती मात्र प्रसंगावधान पाहून पोलिसांनी आंदोलकांना बाजूला केले आणि भरधाव वेगात मालगाडी निघून गेली आज मनमाड बंदच्या पार्श्वभूमीवर मनमाड एसटी बस डेपोतुन सुटणाऱ्या बस सलग दुसऱ्या दिवशी बंद ठेवण्यात आल्या होत्या त्यामुळे आजही सुमारे गाड्यांच्या शंभर फेऱ्या रद्द झाल्याने ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांचे, नोकरदार वर्ग, विद्यार्थी यांचे मोठे हाल झाले असुन प्रवाशांना खाजगी वाहतुक करणाऱ्या गाड्यां मधून प्रवास करण्याची वेळ आली होती यावेळी विविध पक्ष, संघटनाकडून आंदोलनास पाठींबा देण्यात आला  आंदोलनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com