लष्करी जवानाची आत्महत्त्या

residenational photo
residenational photo

नाशिक : येथील आर्टिलरी सेंटरमधील लष्करी जवानाने शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. कृष्णा नागू कोल्हे (31, मूळ रा़ कोल्हापूर) असे आत्महत्या केलेल्या लष्करी जवानाचे नाव असून, देवळालीतील एमटीपार्कच्या शेडमध्ये आज (ता 16) दुपारी कधीतरी गळफास लावून घेतला होता. 
देवळाली कॅम्प पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवळालीतील डेअरी फार्मसमोरील एमटीपार्कमध्ये कृष्णा कोल्हे कर्तव्यावर होता़. गेल्या 5 जानेवारी रोजी राजस्थानातील जोधपूरहून एमटीपार्कमध्ये तो रुजू झाला होता़. दरम्यान आज (ता16) दुपारच्या सुमारास त्याने एमटीपार्कच्या शेडमध्ये नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला़. सदरची बाब सायंकाळी समोर आली. आत्महत्येचे कारण अस्पष्ठ असून याप्रकरणी सुभेदार गुरुतेज निश्चरनसिंग यांनी देवळाली कॅम्प पोलीसांना घटनेची खबर दिली. रात्री उशिरा याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीसात नोंद करण्यात आली आहे़. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com