एमडी तयार करणारा केमिस्ट मुझफ्फरनगरमध्ये जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

नाशिक - ‘एमडी’ हा अमली पदार्थ विक्री करणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील रॅकेट उद्‌ध्वस्त करण्यात नाशिक पोलिसांना यश आले. अमली पदार्थ तयार करणाऱ्या मुख्य सूत्रधारास पोलिसांनी मुझफ्फरनगरमधून (उत्तर प्रदेश) अटक केली. त्याचा बोईसर येथे अड्डा असून, तेथेही सहकाऱ्याला अटक केली. मुख्य संशयित ऑरगॅनिक केमिस्ट्रीत एम.एस्सी. असून, सहाय्यक वैज्ञानिक म्हणूनदेखील काम केले आहे. अवघ्या अकरा दिवसांत नाशिक पोलिसांनी रॅकेट उघडकीस आणले.

पोलिसांनी दोघा संशयितांकडून साडेचार किलो एमडी अमली पदार्थ आणि ते तयार करण्यासाठी लागणारी १८ किलो क्रूडपावडर असा एक कोटी ८० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी या प्रकरणात सात जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून २५ किलो एमडी अमली पदार्थासह तीन कोटी २० लाख रुपयांचा माल हस्तगत केला. पोलिसांनी १६ मेस इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून रणजित मोरे, पंकज दुंडे, नितीन माळोदे यांना अटक करत त्यांच्याकडून २६५ ग्रॅम एमडी अमली पदार्थ जप्त केला होता. 

याप्रकरणी मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्‍स परिसरातून नदीम सलिम सौरठिया आणि सफैउल्ला फारुख शेख यांना अटक करत त्यांच्याकडून २२०० ग्रॅम एमडी पदार्थासह ८० लाखांची जग्वार कार जप्त केली होती. संशयितांच्या चौकशीत मुंबईच्या दोघांनी अरविंदकुमारकडून हा पदार्थ खरेदी करत असल्याची माहिती दिल्यानंतर पोलिस चार दिवसांपासून अरविंदकुमारच्या मागावर होते. अखेर त्यास उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने मुझफ्फरनगरला घरातून अटक केली. दोघांना एक जूनपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. 

पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. हा गुन्हा आता अखेरच्या टप्प्यात आहे. ते कच्चा माल, केमिकल कोठून मिळवत होते, त्याचप्रमाणे आतापर्यंत नाशिकमध्ये आणि इतर आणखी कोणाला त्याची विक्री केली आहे, याचा शोध घेतला जात आहे. 
- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

उच्चशिक्षित सूत्रधार
अरविंदकुमार हा ऑरगॅनिक केमिस्ट्रीत एम.एस्सी. झाला असून, गेल्या दहा वर्षांपासून तो फार्मास्युटिकल क्षेत्रात काम करत होता. पाच ते सहा कंपन्यांमध्ये त्याने रिसर्च सायंटिस्ट म्हणूनदेखील काम पहिले होते. त्याचा सहकारी हरिश्‍चंद्र पंत हादेखील बी.एस्सी.च्या दुसऱ्या वर्षापर्यंत शिकला असून, तो एका फार्मास्युटिकल कंपनीत कामास आहे. अवघ्या काही वर्षांतच लाखो रुपये कमावल्याने त्यांची जीवनशैली बदलली.

Web Title: MD Drug substances maker chemist arrested crime