रेल्वे पोलिसांकडून 73 अल्पवयीन मुले त्यांच्या आई वडिलांच्या स्वाधीन

Manmad
Manmad

मनमाड : हरवलेल्या अल्पवयीन मुलां-मुलींची घर वापसी व्हावी यासाठी भारत सरकारच्या ऑपरेशन स्माईल या मोहिमेअंतर्गत मनमाड रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी गेल्या तीन वर्षात देशभरातील विविध राज्यातील ७३ अल्पवयीन मुलामुलींना आपल्या आई वडिलांच्या स्वाधीन केले. तर सुमारे १४ व्यक्तींना घरच्यांच्या स्वाधीन केले आहे. माय लेकरांच्या शाश्रूनयनाची सुखद भेट याची देही याची डोळा बघून दोघांच्या जीवनात मुस्कान फुलविण्याचे काम या जवानांनी केले आहे.

देशातील एक महत्वपूर्ण रेल्वे स्थानक असलेले मनमाड रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात एक महत्वपूर्ण जंक्शन आहे. येथे देशभरात जाण्यासाठी गाड्या असतात या स्थानकावरून दररोज १४० गाड्या ये जा करत असतात. पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण भारत रेल्वेने जोडणारे रेल्वे स्थानक म्हणून मनमाडची ओळख आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी वर्दळ असते आणि त्यामुळे मुले, मुली, महिला, पुरुष, वृद्ध हरविण्याचे प्रमाणही असते. अशावेळी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांवर मोठी जबाबदारी असते रेल्वेने जात असतांना आपल्या आई वडिलांपासून ताटातूट झालेली, घरातून निघून गेलेली, हरवलेली अशा आपल्या घराची वाट चुकलेल्या अल्पवयीन मुलां मुलींना पुन्हा आपले आई वडील मिळावे, आपले घर मिळावे यासाठी भारत सरकारने ऑपरेशन स्माईल हि मोहीम सुरु केली. रेल्वे गाडीत गस्त घालतांना काही वेळा गाडीच्या कोपऱ्यात मुले रडतांना आढळतात, तर रेल्वे स्थानकावर मुले फिरतांना रडतांना दिसतात आशा मुलांना, महिला, पुरुष व्यक्तींना रेल्वे सुरक्षा बलाचे जवान स्थानकात आणून त्यांची विचारपूस करतात अनेकदा मुले भेदरलेली असतात घाबरतात आशा वेळी मोठी पंचाईत होते. मात्र महिला जवान लहान मुलांचा विश्वास संपादन करून त्यांना खाऊ घालतात गोंजारतात आस्थेने विचारपूस करून त्यांच्या गावाचे नाव, गाव, पत्ता, फोन, मोबाईल नंबर विचारतात माहिती मिळताच स्थानिक पोलिस ठाणे व त्यांच्या पालक, नातेवाइकांशी संपर्क साधण्यात आला. तर काहींना थेट त्यांच्या गावी जाऊन आई वडिलांच्या स्वाधीन करतात आतापर्यंत शंभरच्यावर घटना रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी गेल्या तीन वर्षात मार्गी लावल्या आहेत.

उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, मध्यप्रदेश, आसाम, बंगाल, कर्नाटक आदी राज्यातील तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सुमारे ७३ अल्पवयीन मुलामुलींना तर १४ पुरुष महिलांना आपल्या घरापर्यंत पोहचवले आहे. मुलं आणि आई च्या भेटीचा सुखद संगम शाश्रूनयनाने पाहत आपले काम आणि जबाबदारी सत्कारणी लागल्याचे पाहून या जवानांचेही डोळे पान्हवले आहे एकूणच  दोघांच्या जीवनात मुस्कान फुलविण्याचे काम या जवानांनी केले आहे.

घरवापसी केलेले 
२०१६ मध्ये ५६ व्यक्ती (मुले, मुली, पुरुष महिला)
२०१७ 
मुले - २४, मुली - २५, पुरुष - ५, महिला - ५ एकूण - ५९

२०१८ मुले - १६, मुली - ८, पुरुष - ३, महिला - १ एकूण - २८
सर्व एकूण - १४३ 

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत मुलांची व्यक्तींची घरवापसी केली जात आहे हरवलेले, घरसोडून आलेले अल्पवयीन मुले, मुली, व्यक्ती हे वाईट मार्गाला लागू नये, गुन्हेगारी मार्गाच्या चुकीच्या हाती पडू नये त्यांच्या हातून वाईट कृत्य घडू नये यासाठी दक्ष राहून  सापडलेल्या व शोधलेल्या मुलांना व्यक्तींना त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले जाते.
- के डी मोरे, निरीक्षक रेल्वे सुरक्षा बल, मनमाड रेल्वे स्थानक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com