अमळनेरात आमदाराकडून बॅक संचालकाला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

पालिका निवडणूक मतदानावेळी घडली घटना; तणावपूर्ण स्थिती

जळगाव : अमळेनर पालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना अपक्ष आमदार शिरीष चौधरी यांनी जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील यांना मारहाण केल्याची घटना आर.के. नगरमध्ये घडली. पाटील यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, आमदार चौधरी यांच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आली. 

अमळनेर पालिका निवडणुकीत आमदार शिरीष चौधरी यांची चौधरी मित्र आघाडी, तर जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील यांची शहर विकास आघाडी एकमेकांविरुद्ध लढत आहे. आज (रविवार) मतदानाच्या दिवशी दुपारी साडेतीन वाजता आर.के. नगरात दोघे समोरासमोर आले असता वाद झाला. यात आमदार चौधरी यांनी पाटील यांना मारहाण केली. या घटनेत पाटील जखमी झाले, त्यांना अळमनेरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
पाटील यांच्या समर्थकांनीही आमदार चौधरी यांचे वाहन फोडले. यामुळे वातावरण तंग झाले असून, जळगावहून दंगल नियंत्रण पथक रवाना झाले आहे. 
 
फोटो फीचर

उत्तर महाराष्ट्र

रुग्णवाहिका नाकारली; मृतदेह तहसीलसमोर नांदगाव - सततची नापिकी आणि व कर्जबाजारीपणाला कंटाळून तालुक्‍यातील चांदोरा येथील नामदेव...

01.27 PM

के. सी. पांडे - गारगोटी ‘ग्लोरी’; हिऱ्यापेक्षा अधिक भावाने विकण्याची क्षमता नाशिक - आपण गरिबीची चर्चा अधिक करतो, पण...

01.27 PM

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : जैताणे (ता.साक्री) येथील विकी जिभाऊ जाधव (वय 18) व अशोक (पिंटू) आनंदा पगारे (वय 27) या माळी व...

01.24 PM