मोबाईलवर बोलल्याबद्दल चौघांचे वाहन परवाने रद्द

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

नाशिक - मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्या चौघा वाहनचालकांचे परवाने प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक पोलिसांनी आज रद्द केले. नव्वद दिवसांसाठी त्यांचे परवाने रद्द केले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने वाहनांचे अपघात टाळण्यासाठी मोबाईलवर बोलत चालणाऱ्या चालकांचे परवाने निलंबित करण्याचे आदेश दिले होते.

यासंदर्भात प्रादेशिक परिवहन कार्यालय व शहर वाहतूक पोलिस शाखा यांची संयुक्त बैठक होऊन त्याची कार्यवाही आजपासून सुरू केली. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी अशा चालकांचे परवाने निलंबित करण्याचे आदेश दिले होते. परवाने निलंबित करण्याचे अधिकार प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना (आरटीओ) असल्याने संयुक्‍त मोहीम राबविण्यात येत आहे. आजच्या कारवाईत संभाजी तुकाराम भोसले, नहीद इकबाल कुरेशी, मोहित मनोहर वाघ, दिनेश हिरानंद चावला या चार चालकांचे परवाने रद्द करण्यात आले. विहित कालावधीनंतर वाहन परवाना मिळविण्यासाठी या चालकांना पुन्हा अर्ज करावा लागेल.

Web Title: Mobile vehicle licenses canceled four things