आधुनिक युगातही सर्जा-राजाचे महत्व कायम

रोशन भामरे
गुरुवार, 24 मे 2018

तळवाडे दिगर(नाशिक) - सध्याचे युग हे आधुनिक युग आहे, नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर सर्वच क्षेत्रामध्ये केल्या जात आहे. शेतीमध्ये सुद्धा नवीन तंत्रज्ञानाचा वपार मोठ्या प्रमाणावर केला जात असला तरी आदिवासी भागातील शेतकरी वर्गात सर्जा-राजाचे महत्व आजही कायम आहे.

तळवाडे दिगर(नाशिक) - सध्याचे युग हे आधुनिक युग आहे, नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर सर्वच क्षेत्रामध्ये केल्या जात आहे. शेतीमध्ये सुद्धा नवीन तंत्रज्ञानाचा वपार मोठ्या प्रमाणावर केला जात असला तरी आदिवासी भागातील शेतकरी वर्गात सर्जा-राजाचे महत्व आजही कायम आहे.

पूर्वीच्या काही शेतीमध्ये मशागतीसाठी बैलांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत असे. जमिनदार शेतकरी यांच्याकडे पाच ते सहा बैलजोडया असत. परंतु, सध्याच्या काळात मजुरांअभावी शेतीत कामे करून घेणे जिकीरीचे झाले आहे. जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यानकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत टक्टरचा शेती मशागतीसाठी उपयोग करण्यात येत आहे. मात्र चार ते पाच बैल जोडीऐवजी दोन किंवा एक तरी बैलजोडी आवश्यक असल्याने ते बैलजोडी सोबत ठेवत आहेत.

सध्या शेतीमध्ये मजूर मिळणे कठीण झाले आहे, तर सालगडी, मजूरांअभावी शेती करणे शेतकऱ्यांना करावी लागत आहे. उन्हाळ्यामध्ये शेती मशागतीची कामे ट्रक्टरच्या साहाय्याने करण्यात येत असली तरी पावसाळ्यामध्ये मात्र शेतकऱ्यांना सर्जा-राजावारच अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे आदिवसी ग्रामीण भागात आजही सर्जा-राजाचे महत्व कायम आहे. मात्र पशुपाकांनी पशुधन पाळणे कमी केले असल्यामुळे सर्जा-राजाच्या किमती लाखांवर पोहोचल्या आहेत. सध्या शेती अडचणीची असली तरी मात्र शेतकरी सर्जा-राजाला कायम आपल्यासोबत ठेवत आहे.

यांत्रिकीकरणाचा वापर वाढला
आधुनिक युगात यांत्रिकीकरणाचा परिणाम सर्वच क्षेत्रात दिसून येतो. बळीराजाही सर्रास या यांत्रिकीकरणाचा उपयोग करून आधुनिक शेती करून लागला असल्याने सर्जा-राजाची जोडी आता नामशेष होऊ पाहत आहे. पारंपारिक बैल जोपासण्याच्या पद्धतीत कालानुरूप बदल होऊ लागला आहे. त्याचाच परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या जिवाभावाचा मित्र सर्जा-राजा आधुनिक युगातील शेतीमुळे दुर्लक्षित होऊ लागला आहे. परिणामी चांगल्या जातींच्या बैलांचे प्रमाण कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मोठ्या शेतकऱ्यांकडून हौस म्हणून बैल जोडी...
द्राक्ष, डाळीब आदी बागांचे उत्पादन घेणाऱ्या मोठ्या शेतकऱ्यांकडे हौस म्हणून एक बैलजोडी ठेवली जात आहे.

Web Title: In the modern era, the significance of Sarja-Raja also remained