टरबूजच्या शेतीत कापसाचे आंतरपीक

टरबूज फळपिकाच्या लागवडीसाठी बेडवर्ती मल्चिंग पेपर अंथरुन लोखंडी सळई गरम करून छिद्र पाडताना शेतकरी
टरबूज फळपिकाच्या लागवडीसाठी बेडवर्ती मल्चिंग पेपर अंथरुन लोखंडी सळई गरम करून छिद्र पाडताना शेतकरी esakal

कापडणे (जि. धुळे) : धुळे तालुक्यासह जिल्ह्यात फळ बागायतीचे क्षेत्रात अधिक वाढत आहे. फळ बागायतीला आधुनिकतेची जोडही दिली जात आहे. उत्पादनातही वाढ होत आहे. सध्या मल्चिंग पेपर अंथरुन छिद्र पाडण्याचे काम फळबागायतदार करीत आहेत. शेतकऱ्यांची मल्चिंग पेपरमुळे खर्चात मोठी बचत होत असते. शेतकरी टरबूजमध्ये कापसाचे आंतरपीक घेत आहेत.

धुळे तालुक्यातील शेती बरेड म्हणून ओळखली जाते. या शेतीत शेतकऱ्यांचा शिवारात फळ बागायत करण्याकडे कल वाढला आहे. फळबागायतीसाठी मल्चिंग पेपर अंथरण्याचे व छिद्र पाडण्याचे काम सुरू आहे. धुळे तालुक्यात मच्लिंग पेपरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

मल्चिंग पेपरचे फायदे

बाष्पीभवनामुळे उडून जाणारे पाणी पूर्णतः थांबते. पाण्याची बचत होते. बाष्पीभवन थांबविल्यामुळे जमिनीतील क्षार वरच्या भागावर येण्याचे प्रमाण थांबते. खतांच्या वापरात बचत होते. खतांचे पाण्यात वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते. जमिनीत हानिकारक सूक्ष्मजीवांच्या वाढीस अटकाव होतो.

टरबूज फळपिकाच्या लागवडीसाठी बेडवर्ती मल्चिंग पेपर अंथरुन लोखंडी सळई गरम करून छिद्र पाडताना शेतकरी
Business Idea: 50 हजारात सुरु करा हा बिझनेस, लाखो कमावण्याची ताकद

वार्षिक तणाच्या वाढीस प्रतिकार होतो. प्लॅस्टिकच्या प्रकाश परिवर्तनामुळे काही कीडी-रोग दूर जातात. जमिनीचे तापमान वाढते. जमिनीचे निर्जंतुकीकरण होण्यास मदत होते. आच्छादन पेपरच्या खाली सूक्ष्म वातावरणनिर्मिती होते. ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण अधिक असते. लाभदायक सूक्ष्मजीवांची क्रिया अधिक होते. पेपरखालील जमिनीचे मौलिक गुणधर्म सुधारतात. उगवण २-३ दिवस लवकर होते. सूत्रकृमींचे प्रमाण कमी होते. पावसाच्या थेंबामुळे होणारी जमिनीची धूप थांबते, अशी माहिती शेतकरी योगेश पाटील यांनी दिली.

"या वर्षी टरबूज शेतीत कापसाचे आंतरपीक घेत आहे. द्विपिकमुळे सरासरी उत्पादनात वाढ होत असते. दोन एकर क्षेत्रात टरबूज व कापसाचे उत्पादन घेत आहे. आधुनिक शेतीमुळे उत्पादनात वाढ होणार आहे."

-भाऊसाहेब रणाईसकर, युवा शेतकरी, कापडणे

टरबूज फळपिकाच्या लागवडीसाठी बेडवर्ती मल्चिंग पेपर अंथरुन लोखंडी सळई गरम करून छिद्र पाडताना शेतकरी
काळ्या मातीत हवा ‘यलो पॅटर्न’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com