मोटारसायकलींची धडक साकळीच्या तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 ऑगस्ट 2016

साकळी (ता. भुसावळ)/ भुसावळ - येथील तापी नदीच्या पुलावर दोन मोटारसायकलस्वारांची समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातात साकळी (ता. यावल) येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 11 वाजेच्या सुमाराला घडली. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

साकळी (ता. भुसावळ)/ भुसावळ - येथील तापी नदीच्या पुलावर दोन मोटारसायकलस्वारांची समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातात साकळी (ता. यावल) येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 11 वाजेच्या सुमाराला घडली. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

मृताचे नाव दीपक सोनवणे (वय 25) असे आहे. अपघाताचे वृत्त कळताच साकळी ग्रामस्थांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. कर्त्या व मोठ्या मुलाचा मृत्यू झाल्याने त्याच्या आई-वडिलांनी एकच टाहो फोडला. याच घटनेतील दुसऱ्या मोटारसायकलस्वार गंभीर जखमी असून त्यांच्यावर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी शहर पोलिसांसह वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.

दीपक सोनवणे हा कामानिमित्त भुसावळला आला होता. भुसावळला तारकेश्‍वर मंदिराजवळील जय भद्रा ऍटोजवळ त्याचा एक मित्र मनोज बारी हा पाने खरेदी करताना दिसला. तेव्हा दीपकने मनोजजवळील बजाजची (फोर एस) ही गाडी मागितली. तापी पुलाच्या मध्यभागीच समोरासमोर मोटारसायकलींची जोरदार धडक झाली. यात दीपकचा जागीच मृत्यू झाला. घटनेचे वृत्त कळताच नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुलावर काय गर्दी झाली आहे हे दुरून मनोजला दिसले, म्हणून तो ते पाहण्यासाठी जवळ आला असता आपली गाडी त्याने ओळखली आणि पोलिसांना हा दीपक सोनवणे असल्याची माहिती दिली. त्यानंतर याबाबतचे वृत्त साकळी येथे पसरले आणि एकच शोककळा पसरली. मयत दीपक याच्या पश्‍चात आई-वडील, दोन भाऊ, एक विवाहित बहीण असा परिवार आहे.

दीपकचा मृतदेह प्रथम भुसावळ पालिका रुग्णालयात नेण्यात आला या ठिकाणी शवविच्छेदन करण्याची सुविधा नसल्याने यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी उशिरा साकळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृत्यू जिंकला, जिद्द हरली
घरची परिस्थिती बेताचीच असल्याने साकळी येथील दीपक सोनवणे या तरुणाने अल्प वयात घराची जबाबदारी घेतली होती. साकळीतील रेखानगर प्लॉटमध्ये मातीच्या घरात ताराचंद सोनवणे यांचा परिवार गरिबी पण गुण्यागोविंद्याने राहात होता. ताराचंद सोनवणे यांना तीन मुले, एक मुलगी. त्यातही सर्वांत लहान मुलगा मुका आहे. प्रतिकूल परिस्थितीत दीपक वयाच्या दहा-बारा वर्षांपासूनच रोजंदारीने कामाला लागला. त्याला मिळणाऱ्या मजुरीच्या पैशातून परिवाराचा उदरनिर्वाह होत असे. पण नियतीच्या मनात काही ओर होते. काही दिवसांपूर्वीच घराजवळच दीपकला सर्पदंश झाला होता. तातडीने दवाखान्यात जाणे शक्‍य होणार नाही म्हणून हिंमती दीपकने सर्पदंश झालेल्या डाव्या पायावर ब्लेडने स्वतः:च्या हाताने वार करुन रक्तस्राव होऊ दिला, जेणेकरून विष शरीरात भिनले जाणार नाही. इतके कमी झाले की काय म्हणून हर्नियासारख्या आजाराने ग्रासले. त्याआजाराशी महिनाभर झुंजल्यानंतर दीपक पुन्हा उभा राहिला. पण आज काही कामानिमित्त भुसावळला येताना काळाने डाव साधला. मृत्यू जिंकला आणि जिद्द हरली... 

Web Title: motorcycle hit the youth's death

टॅग्स