प्रतिकूल परीस्थितीवर मात मृणालीने मिळविले ८३.२३ टक्के गुण 

mrunali
mrunali

तळवाडे दिगर (नाशिक) : खमताणे (ता.बागलाण) येथील गुरुकुल सायन्स कॉलेजच्या मृणाली महाले या विद्यार्थिनीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत विज्ञान शाखेतून ८३.२३ टक्के गुण मिळवत विद्यालयात दुसरा क्रमांक मिळविला. अवघे चार गुण कमी पडल्याने तिचा प्रथम क्रमांक हुकला. विशेष म्हणजे मृणालीच्या आईने आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी त्याच शाळेत वसतिगृहात स्वयंपाकी म्हणून काम केले.

दोन महिन्यांची असतानाच डोक्यावरून वडिलांचे क्षेत्र हरपले. त्यातच दोन मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी आली ती आई वर मात्र त्या आईने खचून न जाता धेर्याने खंबीरपणे उभे राहत दोन्ही मुलीना शिकाविनाचे ठरवले व मोठ्या मुलीला इंजिनिअर करून नोकरीला लावले. व लहान मुलीच्या शिक्षणासाठी स्वताच पोट पाणी भरेल आणि मुलीचे शिक्षक पण होईल याचा शोध सुरु केला आणि दोन वर्षांपूर्वी त्यांना जागा मिळाली ती खमताणे येथील “माणूस घडविणाऱ्या गुरुकुलची” व तेथील कुलगुरू प्रा. जितेंद्र आहेर यांनी उषा महाले (आई) ला आपल्या शाळेतील वसतिगृहात नोकरी दिली आणि मुलगी मृणाली महाले हिला अकरावी आणि बारावीसाठी विनामूल्य प्रवेश दिला.

आज बारावीचा निकाल हाती आला आपली हुशारी जिद्द व चिकाटीच्या जोरावर आईला तिच्या कामात मदत करून तिने विज्ञान शाखेत ८३.२३ टक्के मार्क्स मिळवत ती यशस्वी झाली तिचा व तिच्या आईचा आनंद गगनात मावेना आत्ता तीच पुढच स्वप्न आहे ते डॉक्टर होण्याच त्यासाठी तिने प्रवेश परीक्षा देखील दिली असून निव्वळ पैसा नाही म्हणून माघार न घेता जो पर्यंत प्राण आहे तोपर्यंतच जिद्दीने शिकण्यची तिची उमेद आहे. मात्र दोन पाच हजाराची  नोकरी त्यात डॉक्टर कस व्हायचं असा प्रश्न मृनालीला पडला आहे. तिला भरारी घेण्यासाठी गरज आहे ती आत्ता आर्थिक मदतीची.

“माझ्या आईने अतिशय खडतर परिस्थितीत दिवस काढून माझे व माझ्या बहिणीचे शिक्षण केले. दहावी नंतर नशिबाने साथ देत मला खमताने येथील ‘गुरुकुल’ कॉलेज मध्ये मोफत प्रवेश मिळाला व तेथील गुरुजन वर्गाचे उत्तम मार्गदर्शन मिळाले व मी यशस्वी झाले.आत्ता पुढे माझे डॉक्टर होण्याचे स्वप्न आहे.”                
- मृणाली महाले, यशस्वी विद्यार्थिनी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com