पुणेगाव-डोंगरगाव कालव्याच्या चाचणीला यंदा मिळेल मुहूर्त

yeola
yeola

येवला - पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहच कालव्याची पूरपाण्याने चाचणी घेण्याचा प्रयत्न मागील वर्षी तीनदा पाणी सोडूनही फसला होता.यावर्षी आता धरणे भरल्याने पुन्हा चाचणीचा आशावाद वाढला आहे.त्यातच माजी उपमुख्यमंत्री  आमदार छगन भुजबळ यांच्या मागणीनुसार कालव्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरवात आली आहे.त्यामुळे चाचणीला यंदा मुहुर्त मिळेल अशी अपेक्षा आहे.

माजी उपमुख्यमंत्री भुजबळ यांनी मतदारसंघातील दौर्‍यावेळी मागील आठवड्यात विखरणी येथे बोलताना चांगला पाऊस झाला तर पूरपाण्याने या कालव्याची चाचणी होईलच असे आश्वासन दिले होते. त्यादृष्टीने चाचणीपूर्वी कालव्यातील अडथळे दूर करण्यात यावे, अशी मागणी भुजबळ यांनी पत्राद्वारे संबधित विभागाकडे केली असून, त्यानुसार या कामास सुरुवात करण्यात आल्याचे भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे व पंचायत समितीचे सदस्य मोहन शेलार यांनी सांगितले.

कालव्याद्वारे तालुक्यातील लाभक्षेत्रात येणार्‍या गावांना पाणी सोडण्याचे प्रस्तावित आहे.मात्र या कालव्याची पाहणी केली असता या कालव्यात मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली तसेच मोठमोठे दगड व माती साठली असून पूरपाणी सोडल्यास पाण्याच्या प्रवाहाला अडथळा येऊन पाणी पुढे जाऊ शकणार नाही.त्यामुळे कालवा स्वच्छतेची मागणीही भुजबलानी केली होती.त्यानुसार पुणेगाव ते दरसवाडी या ६३ कि. मी. अंतरापैकी २८ ते ६३ किमी दरम्यान कालव्यातील अडथळे तसेच साफ सफाईचे काम सुरु करण्यात आले आहे.दरसवाडी ते बाळापुर दरम्यानची दुरुस्ती होणार असल्याची माहितीही लोखंडे व शेलार यांनी दिली आहे.

गेल्या वर्षी अपयश,यंदा आशावाद
गत वर्षी कालव्याची चाचणीच्या मागणीसाठी शेलार यांच्यासह नागरीक कालव्यावरच उपोषणाला बसले होते.त्यानुसार पाणी आले पण दुर्दैवाने पाउस थांबल्याने व काही ठिकाणी कालवा फोडण्यात आल्याने चाचणी पूर्ण होऊ शकली नव्हती.त्यावेळी भुजबळ तुरुंगात नसते तर चाचणी पूर्ण झाली असती, अशी त्या भागातील शेतकर्‍यांची भावना आहे. आता  भुजबळ स्वत: सक्रीय झाल्याने पुणेगाव आणि दरसवाडी धरण ओव्हरफ्लो झाले तर या वेळेस कालव्याची चाचणी पूर्ण होणारच असा आशावाद लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com