गाळेधारकांचा विषय ॲडव्होकेट जनरलकडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

जळगाव - गेल्या सहा वर्षांपासून चिघळत असलेल्या गाळेकराराच्या विषयासंदर्भात आज गाळेधारकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. याप्रश्‍नी पुन्हा आंदोलन छेडावे लागेल, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्यानंतर पालकमंत्र्यांनी यासंदर्भात कायदेशीर मार्ग काढण्यासाठी हे प्रकरण ॲडव्होकेट जनरल यांच्याकडे देण्यात आले असून, त्यांच्या अभिप्रायानंतर याबाबत निर्णय घेऊ, असे आश्‍वासन त्यांनी दिले. 

महापालिकेच्या मालकीच्या १८ संकुलांमधील मुदत संपलेल्या गाळेकराराचा तिढा अद्यापही कायम आहे. यासंदर्भात आज गाळेधारकांनी पालकमंत्री पाटील यांची भेट घेतली. त्यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी पालकमंत्र्यांनी ॲडव्होकेट जनरलकडे हे प्रकरण दिले आहे. लवकरात लवकर यातून योग्य मार्ग काढला जाईल. गाळेधारकांनी चिंता करू नये, असे आश्‍वासन दिले. यावेळी गाळेधारक संघटनेचे पदाधिकारी संजय पाटील, युवराज वाघ, राजेश पिंगळे, तेजस देपुरा, पंकज मोमाया,वसीम काझी, दीपक मंधान, सुजित किनगे, राजेश समदाणी, राजेंद्र शिंपी, बाळासाहेब पाटील, भागवत मिस्तरी, रवींद्र निकम हे उपस्थित होते.

याचिकेवर आता २३ एप्रिलला निर्णय
महापालिका मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांना मिळालेल्या थकीत भाड्याच्या बिलासंदर्भात दाखल  याचिकेवर आता २३ एप्रिलला निर्णय होण्याची शक्‍यता आहे. 

जळगाव महानगरपालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलांपैकी मुदत संपलेल्या १८ व्यापारी संकुलातील २३८७ गाळेधारकांना सन २०१२ ते डिसेंबर २०१७ पर्यंत थकीत भाड्यापोटी बिले अदा करण्यात आलेली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हा तिढा कायम असून या अवाजवी व वाढीव बिलांना गाळेधारकांचा विरोध आहे. दरम्यान, प्रशासनाने दिलेल्या या अवास्तव बिलांच्या संदर्भात मनपा प्रशासनाच्या विरोधात गाळेधारकांनी याचिका दाखल केली आहे. जिल्हा न्यायालयात या याचिकेवर कामकाज सुरू असून दोन्ही पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला आहे. या याचिकेवर आज निर्णय होण्याची शक्‍यता होती. परंतु न्यायालयाने तारीख पुढे ढकलली. त्यामुळे आता २३ एप्रिलला निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: municipal show issue advocate chandrakant patil