भादलीत पती-पत्नीसह दोघा लेकरांना संपविले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

जळगाव - तालुक्‍यातील भादली बुद्रुक येथील भोळेवाड्यात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी पती, पत्नीसह दोघा चिमुकल्यांची निर्घृण हत्या केल्याची भीषण घटना आज सकाळी सकाळी उघडकीस आली. प्रदीप सुरेश भोळे (वय 45) त्याची पत्नी संगीता (33) मुलगी दिव्या (8) व मुलगा चेतन (5) अशी या कुटुंबातील मृतांची नावे आहेत. 

जळगाव - तालुक्‍यातील भादली बुद्रुक येथील भोळेवाड्यात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी पती, पत्नीसह दोघा चिमुकल्यांची निर्घृण हत्या केल्याची भीषण घटना आज सकाळी सकाळी उघडकीस आली. प्रदीप सुरेश भोळे (वय 45) त्याची पत्नी संगीता (33) मुलगी दिव्या (8) व मुलगा चेतन (5) अशी या कुटुंबातील मृतांची नावे आहेत. 

शेतजमीन विक्रीतून मिळालेल्या रकमेसाठी संशयितांनी हे सामूहिक हत्याकांड घडविल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असला, तरी घटनेमागील अन्य कारणांचाही शोध घेतला जात आहे. दोन्ही बाजूने कुडाचे घर असूनही गल्लीत कोणालाही या घटनेचा थांगपत्ता लागला नाही, याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत असून, या घटनेच्या तपासाचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. 

भादली बुद्रुक येथे भोळेवाड्यातील अरुंद गल्लीत हॉटेलमध्ये स्वयंपाकी असलेले प्रदीप भोळे हे आपल्या चौकोनी कटुंबासह वास्तव्याला होते. दोन्ही बाजूला शेजाऱ्यांची सामाईक भिंत, एका बाजूला तुरकाठ्यांचे कूड व समोरून कच्चा आडोसा उभारलेल्या घरात भोळे कुटुंबीय राहत होते. आज सकाळी साडे सहा ते सातच्या सुमारास पाणी भरण्यासाठी उठलेल्या शेजारील महिलेस प्रदीप भोळे यांच्या घराचे दार उघडे दिसले. घरात दाराजवळ मोबाईल वाजत असताना कुणीच उचलत नव्हते. मुलांच्या शाळेची वेळ झाल्याने शेजारी राहणाऱ्या अलका दिनकर भोळे यांनी घरात डोकावून पाहिले. तेव्हा संपूर्ण भोळे कुटुंबीय रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. त्यांनी आरडाओरड करताच गल्लीतील रहिवाशांनी धाव घेतली. काही क्षणातच भोळे कुटुंबीयांच्या सामूहिक हत्येची चर्चा गावभर पसरली. घटनेची माहिती नशिराबाद पोलिसांना देण्यात आली. 

शेतजमिनीचा सौदा 
प्रदीप भोळे यांनी भोलाणे रस्त्यावरील वडिलोपार्जित तीन बिघे शेती विकून आलेल्या पैशांतून हॉटेल व्यवसाय थाटण्याचा बेत आखला होता. काही पैशांत हॉटेल आणि उर्वरित पैशांनी घराचे बांधकाम करण्याचा विचार भोळे दांपत्यांनी केला होता. अवघ्या काही दिवसांपूर्वीच गावातील महेश मांगीलाल पाटील यांच्याशी शेतजमिनीचा सौदा ठरून प्रचलित दरानुसार सुमारे 14 लाखांपर्यंत शेतविक्रीचा व्यवहार ठरला होता. बयाणा म्हणून पाटील यांनी 85 हजार रुपये भोळे यांना दिले होते. उर्वरित रक्कम धनादेशाने देण्याचे ठरले होते. तसेच आताही पन्नास हजाराचा धनादेश व 35 हजार रुपये रोख त्याला दिले असल्याचे जमीन खरेदीदार महेश पाटील यांनी सांगितले. दरम्यान, प्रदीपवर सोसायटीचेही किरकोळ कर्ज होते, तर बचतगटाचे पन्नास हजार रुपये कर्ज असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 

Web Title: murder in jalgaon