नांदगावमध्ये आप कार्यकर्त्यांचे तहसील प्रवेशद्वारापुढे काटेरी झुडपे घेऊन आंदोलन

In Nandgaon AAP workers started agitation before tahsil entrance
In Nandgaon AAP workers started agitation before tahsil entrance

नांदगाव : ग्रामीण भागातील शिवारासह अन्य रस्त्यांवर असलेल्या काटेरी झुडूपांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पक्षाच्या वतीने येथील तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेश द्वारावर काटेरी झुडपे टाकीत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनाने नांदगावला येवल्याहून शासकीय बैठकीला आलेल्या उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे यांचे लक्ष वेधण्यात आले. आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारीत दराडे यांनी कारवाईचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. 

सध्या तालुक्याच्या विविध ग्रामीण भागातून असलेल्या शिवार व अन्य रस्त्यातून जातांना शेतकऱ्यांना व प्रवाशांना तसेच वाहनचालकांना स्वतःला सांभाळत प्रवास करावा लागतोय. त्यात सर्वाधिक काटेरी झुडपे गिरणा डॅम मळगाव मार्गवर असून बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेसह दुचाकी वरील अन्य दोघे असे एकूण जण जखमी झाल्याचा प्रकार घडला होता

याअनुषंगाने आम आदमी पार्टीने तहसीलदारांना निवेदन देऊन रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता. तहसीलच्या मुख्य प्रवेश द्वारावरच काटेरी झुडपे आणून टाकण्याचा इशारा देण्यात आल्याने पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता आंदोलनकर्ते विशाल वडघुले व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांना पोलिसांनी अडविले.

दरम्यानच्या काळात तहसीलमधील साप्ताहिक शासकीय बैठकीला आलेल्या उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे यांच्या पुढ्यात काटेरी झुडपे घेऊन प्रवेशद्वारावर आंदोलनकर्ते त्यांना दिसले दराडे यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले व कारवाईचे आश्वासन दिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com