आधी मतदान, मग लग्न 'कर्तव्य'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

नाशिक- मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पडता यावे म्हणून आजच 11 वाजता लग्न असूनही 'तिने' सकाळी 8 वाजता आग्रहाने आपला मतदानाचा हक्क बजावला. तसेच, दुसरीकडे मखमलाबाद येथील एका युवकानेही स्वतःच्या लग्नापूर्वी महापालिकेसाठी मतदान केले. नाशिकमधील जागरुक युवक आणि युवतीने आपल्या कृतीतून तरुणांना मतदानाचा सकारात्मक संदेश दिला आहे. 

नाशिकमधील माणिकक्षानगरमधील रहिवाशी भाग्यश्री जगताप हिचा आज सकाळी अकरा वाजता विवाह सोहळा पार पडला. लगीनघरी कार्यक्रमाची धांदल सुरू असतानाही तिने विवाहाच्या अगोदर सकाळी आठ वाजता द्वारका भागातील अटलबिहारी वाजपेयी शाळेत जाऊन मतदान केले. मखमलाबाद येथील भूषण शिंदे या तरुणाने लग्नापूर्वी आवर्जून मतदान केले. मगच लग्नासाठी तो रवाना झाला. 

कुठे वेग, तर कुठे थंड प्रतिसाद
दरम्यान, नाशिकमध्ये 11 वाजेपर्यंत 18.5 टक्के मतदान झाले. नांदगाव तालुक्यात सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत 21 टक्के मतदान झाले. भालूर गटात वेग मंदावलेला होता. जातेगाव गटात दहापर्यंत दहा टक्के मतदान झाले. 

नॅशनल उर्दू हायस्कूलमध्ये मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. म्हसरुळ मतदार यादीत अधिकाऱ्यांना अनेक मतदारांची नावे शोधावी लागली. पेठ रोडवरील हमालवाडीत तणावामुळे शाळा क्रमांक 56 मध्ये संथ गतीने मतदान झाले. 

म्हसरुळ मतदार यादीत नाव नाही म्हणून विभागीय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या गाडीभोवती मतदारांची गर्दी झाली. अनेकांची नावेच सापडत नसल्याने महापौरांच्या प्रभागात गोंधळ उडाला होता. 
नगरसुल येथील मतदान केंद्रावर सकाळी नऊ वाजल्यापासूनच मतदानासाठी रांगा
 लागल्या. नगरसुल येथील मतदान केंद्राबाहेर झालेली गर्दी व मतदानासाठी उत्साह दिसून आला. 
 
Web Title: nashik girl cast vote first, then got married

व्हिडीओ गॅलरी