नाशिक - पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप 

नाशिक - पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप 

नाशिक - धामणगाव (ता. इगतपुरी) येथे दारुसाठी पैस न दिल्याच्या रागातून लाकडी दांडक्‍याने पत्नीचा खून करून, तिचा मृतदेह जमिनीत पुरून पुरावा नष्ट करणाऱ्या पतीला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. टी. पांडे यांनी जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सुखदेव चंदर मोरे (44, रा. धामणगाव, ता. इगतपुरी, जि. नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. 4 जून 2016 रोजी सदरची घटना घडली होती. 

मुंढेगाव अस्वली स्टेशन रोडवरील उंडओहोळ वस्तीवर सुखदेव मोरे, पत्नी गुलाबबाईसह राहत असताना 4 जून 2016 रोजी त्याने पत्नीकडे दारुसाठी पैसे मागितले होते. तिने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे त्याचा राग येऊन त्याने लाकडी दांडक्‍याने पत्नीला बेदम मारहाण केली. त्यावेळी गोंधळाच्या कार्यक्रमासाठी जाणारे जगन कचरू माळी व त्याची पत्नी शांताबाई यांनी त्यास, पत्नीला मारु नको असे सांगितले असता, त्याने तुम्हाला काय करायचे असे म्हणाला. त्यामुळे माळी दाम्पत्य निघून गेले. परंतु, त्यानंतर आरोपीच्या मारहाणीत त्याची पत्नी मृत झाली. त्यामुळे त्याने तिचा मृतदेह खांद्यावर घेऊन जमिनीत पुरण्यासाठी घेऊन जात असतानाच, गोंधळाचा कार्यक्रम आटोपून शांताबाई माळी या परत येत असताना त्यांना आरोपी दिसला होता. त्यावरून जगन माळी यांनी वाडिवऱ्हे पोलीसात खबर दिली होती. त्यानुसार, खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. 

याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.टी. पांडे यांच्या न्यायालयात खटला सुरू होता. खटल्यात सरकारी वकील योगेश कापसे यांनी आठ साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शी जगन माळी, त्यांची पत्नी शांताबाई, जमिनीतून प्रेत उकरून शवविच्छेदन करणारे डॉक्‍टर, तहसिलदार यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. त्यानुसार, आरोपी सुखदेव मोरे यास जन्मठेप व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली न्यायालयाने ठोठावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com