'डीजे'वाले नगरसेवक गजानन शेलार अखेर पोलिसांना शरण

नरेश होळनोर
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

गणेशोत्सव मिरवणुकीत ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करीत चिथावणी देत पोलिसांना दिले होते आव्हान

नाशिक : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवून ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले व उचच न्यायालयाने जामीन नाकरल्यानंतरही लपतछुपत फिरणारे नगरसेवक गजानन शेलार यांनी आज पोलिसांसमोर शरणागती पत्करली.

शेलार स्वत:हून आज (बुधवार) सकाळी भद्रकाली पोलीस ठाण्यात हजर होऊन पोलिसांना शरण आले. गणेशोत्सव मिरवणुकीत ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करीत चिथावणी देत त्यांनी पोलिसांना आव्हान दिले होते.

या प्रकरणी पोलिसांनी त्यानच्या दंडे हनुमान मित्र मंडळावर गुुन्हा दाखल केला होता . न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केल्याने दोन आठवड्यापासून शहरातून गायब असलेले गजुनाना आज पोलिसांसमोर शरण आले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :