लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार 

नरेश होळनोर
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

मुंबईच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल 

नाशिक : मुंबईतील तरुणाशी प्रेमसंबंध जुळल्यानंतर त्याने लॉजवर नेऊन बलात्कार केला. एवढेच नव्हे तर त्यातून त्याने गोड बोलून तिचा गर्भपातही केला मात्र त्यानंतर त्याने लग्नाला नकार देत युवतीला शिवीगाळ केली. याप्रकरणी मुंबईत बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर तो पंचवटी पोलिसात वर्ग करण्यात आलेला आहे. 

पीडित 20 वर्षीय युवतीने (रा. केटीएचएम महाविद्यालयामागे, गंगापूररोड) दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडित युवती ही मुंबई येथे पोलीस दलामध्ये ट्रॅफिक वॉर्डन म्हणून सेवा करते. याच दरम्यान, तिची ओळख संशयित सागर शैलेश वळवी (22, रा. बीएमसी कॉलनी, नॅशनल पार्क, बोरीवली) याच्याशी झाली. संशयित वळवी हा एका नामांकित कंपनीत नोकरीला असून दोघांमधील भेटीनंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर संशयीताने युवतीस लग्नाचे आमीष दाखवून आपल्या घरी व त्यानंतर नाशिकमधील पंचवटीतील मिथील लॉज, चांदवड येथील एका लॉजवर नेऊन वेळोवेळी बलात्कार केला. युवती गर्भवती राहिल्याने संशयिताने तिच्याशी गोड बोलून गर्भपात करून घेतला. सदरील घटना 1 मे ते 15 ऑगष्ट यादरम्यान घडली आहे. 

दरम्यान, पीडित युवतीने संशयित वळवी याच्याकडे लग्नासाठी आग्रह धरला असता, त्याने पीडित युवतीला शिवागाळ व धमकी देत लग्नास नकार दिला. त्यामुळे पीडित युवतीने बृहन्मुंबई पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. मात्र सदरची घटना ही नाशिकमधील लॉजिंगमध्ये घडल्याने मुंबई पोलिसांनी सदरचा बलात्काराचा गुन्हा पंचवटी पोलिसांकडे वर्ग केला आहे.

Web Title: nashik marathi news rape with fake marriage proposal