घोटीजवळ रेव्ह पार्टी; 7 मुलींसह 6 मुले ताब्यात

नरेश होळनोर
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

पोलिसांचा छापा

नाशिक : घोटी-इगतपुरी रस्त्यावरील बलाइ दुरी गावानजीक हॉटेलमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी मध्यरात्रीला छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 7 मुली व 6 मुलांना ताब्यात घेतले असून ते मुंबईचे असल्याचे समजते.

नाशिक ग्रामीण पोलिस व इगतपुरी पोलिसांना बलाईदुरी गावानजीक एका हॉटेलमध्ये रेव पार्टी सुरु असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकला असता, याठिकाणी मुलेमुली मद्यपान करून अश्लील नृत्य करताना आदळून आले.

सदरचे हॉटेल हे मुंबईच्याच व्यावसायिकांचे असून रेव पार्टीचे ऑनलाइन नोंदणी करण्यात आली होती. संशयिताना पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :