शिवसेनेत हाणामारी; 'मातोश्री'कडून गंभीर दखल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म देण्याची युक्ती आज शिवसेना नेत्यांच्या चांगलीच अंगलट आली. एबी फॉर्मवरून दिवसभर हाणामारीचे प्रकार घडले असतानाच सिडकोत बोगस फॉर्म वाटप झाल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे पक्षात दुफळी माजली असून, चार दिवसांपासून एबी फॉर्म 'मातोश्री'वरून पाठविले असताना शेवटच्या दिवशी का वाटप झाले, याची चौकशी करण्यासाठी शिवसेना नेत्यांचे एक पथक नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्‍यता आहे. 

विशेष म्हणजे, रात्री उशिरा एकनिष्ठ कार्यकर्त्यांना याची कुणकुण लागल्यानेच, त्यांनी उमेदवारी न दिल्याचे कारण देत राजीनामे देत या एकूणच प्रकारातून अंग काढून घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, एबी फॉर्मवरून झालेले शिवसेनेचे डॅमेज कंट्रोल सावरण्यासाठी एक गट रात्रभर सक्रिय होता. सिडको विभागात पक्षाची ताकद भक्कम करण्यासाठी उमेदवार आयात करण्यात आले. त्यांना पक्षाची उमेदवारीही घोषित करण्यात आली. आज एबी फॉर्म दाखल करण्यासाठी उमेदवार पोचले, त्या वेळी त्यांच्या जागी भलत्याच उमेदवारांचे एबी फॉर्म आढळून आले. त्या एबी फॉर्मची कलर झेरॉक्‍स असल्याचे स्पष्ट झाल्याने संतापात अधिक भर पडली व त्यातूनच शिवसेनेत दुफळी माजली आहे. याच प्रकरणावरून रात्री उशिरा पक्षाच्या कोअर कमिटीतील काही सदस्यांनी, आपण शिवसेना सोडत असल्याचे जाहीर करून प्रकरणातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे. 

पैसे घेऊन एबी फॉर्मचे वाटप? 
पक्षाचा एबी फॉर्म देताना मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप माजी महापौर विनायक पांडे यांनी केला असून, त्याचीही गंभीर दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत या आरोपात तथ्य आढळल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

उत्तर महाराष्ट्र

धुळे - सुरवातीला संवाद माध्यमातील क्रांती वाटणारा मोबाईल कधी ‘फोर जी’वर गेला अन्‌ मुले त्याच्या आहारी गेली, हे आता...

04.51 AM

नाशिक - आदिवासी विकास विभागाच्या जिल्हाभरातील वसतिगृहांत रविवारी भोजन ठेकेदारांनी बिल रखडविल्याच्या मुद्द्यावरून जेवण न देता...

02.51 AM

तळेगाव दिघे (जि. नगर) : शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी तसेच त्यांच्या मुला - मुलींना शैक्षणिक सवलती, शैक्षणिक कर्ज...

रविवार, 20 ऑगस्ट 2017