नाशिकच्या निरीक्षणगृहातून दहा बालगुन्हेगारांचे पलायन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

नाशिक - येथील बालगुन्हेगारांच्या निरीक्षणगृहातून दहा मुलांनी पलायन केल्याची गंभीर घटना आज घडली. 12 ते 17 वयोगटातील बालगुन्हेगारांनी निरीक्षणगृहातील हॉलच्या खिडकीचे गज वाकवून पलायन केले. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांचे पथक बालगुन्हेगारांचा शोध घेत आहे.

येथील उंटवाडी रस्त्यावरील बालनिरीक्षणगृहात चोऱ्या, हाणामाऱ्या यांसारख्या गुन्ह्यातील अल्पवयीन मुलांना न्यायालयाच्या आदेशानुसार
ठेवले जाते. काल (ता.7) सकाळी निरीक्षणगृहातील बालगुन्हेगारांचा चहा-नाश्‍ता झाल्यानंतर त्यांना आवारातील एका हॉलमध्ये पाठविण्यात आले. दहा जणांनी त्या हॉलच्याच एका खिडकीचे गज वाकवून पलायन केले. ही बाब सायंकाळी निरीक्षकांच्या निदर्शनास आली. याप्रकरणी तातडीने मुंबई नाका पोलिसांना माहिती दिली आहे. पोलिसांचे पथक तातडीने पलायन केलेल्या बालगुन्हेगारांच्या घराकडे पाठविण्यात आले; तर एक पथकही त्यांच्या मागावर आहे. पलायन केलेल्या बालगुन्हेगारांतील काही पंचवटी परिसरातील असून, काही परगावचे आहेत. त्यांच्या शोधासाठी ठिकठिकाणच्या बसस्थानक व रेल्वेस्थानकांवर पाळत ठेवण्यात येत आहे.