नाशिकमध्ये कारवाईत 17 गुन्हेगार जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

नाशिक - जिल्ह्यात गुन्हे करून लगतच्या जिल्ह्यातील शहरांमध्ये लपून बसलेल्या 17 सराईत गुन्हेगारांच्या ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्‍या आवळल्या आहेत. संशयितांनी 18 गुन्ह्यांची कबुली दिली असून, चोरीचे मोबाईल, वाहनांसह 13 लाख 12 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांतर्गत दाखल दरोडे, जबरी चोरी, चोरी, वाहनचोरी यासंदर्भात पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी गुन्ह्यांची उकल करण्याचा आदेश दिला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक करपे यांनी गुन्ह्यांची माहिती घेत संशयितांच्या शोधासाठी पथके परजिल्ह्यांत रवाना केली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक, नगर, पुणे, औरंगाबाद जिल्ह्यांत जाऊन नाशिक जिल्ह्यात गुन्हे करून पसार झालेल्या संशयितांचा शोध घेत या 17 सराइतांना अटक केली.