मराठा महामोर्चासाठी 210 सदस्यांची राज्य समिती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

नाशिक - मराठा समाजाच्या आरक्षणासह कोपर्डीतील चिमुरडीवरील अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ बुधवारी (ता. 9) मुंबईत निघणाऱ्या मराठा क्रांती महामोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यभरातील दोनशे दहा सदस्यांची समिती जाहीर केली असल्याची माहिती बुधवारी सकाळी देण्यात आली. समितीत नाशिकमधील सहा जणांचा समावेश आहे.

समितीत मुख्य मार्गदर्शक खासदार उदयनराजे भोसले व खासदार संभाजीराजे भोसले हे असतील. समाजातील तज्ज्ञ व अभ्यासू अशा 210 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून पाच ते सहा लोकांची निवड करण्यात आली आहे. समाजातर्फे क्रांतिदिनानिमित्त 9 ऑगस्टला मुंबईत महामूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या महामोर्चाच्या तयारीसाठी राज्यभरात नियोजन समितीचे मेळावे होणार आहेत.