बंदोबस्तात 260 ट्रक शेतमालाची वाहतूक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

नाशिक - शेतकरी संपातील आक्रमकता मोडून काढण्यासाटी सक्रिय झालेल्या प्रशासनाने सुरक्षित मालवाहतुकीसाठी सुरू केलेल्या सुरक्षा कॉरिडॉरमधून 24 तासांत 260 वाहनांतून बंदोबस्तात शेतमाल रवाना केल्याचा दावा केला आहे. लहान-मोठी 124 वाहने भाजीपाला, 41 ट्रक कांदा, नऊ ट्रक धान्यांसह विविध जिल्ह्यांतून जाणारे आणि नाशिकमधून रवाना होणाऱ्या दुधाचे 84 टॅंकर सुरक्षा कॉरिडॉरमुळे रवाना केल्याचे म्हटले आहे. शेतकरी आंदोलनाची धार मोडून काढण्याच्या प्रयत्नातील प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक सुरू केली आहे. काल सकाळी सहापासून, तर आज दुपारी बारापर्यंत मालवाहतूक पूर्ववत करण्याचे जोरदार प्रयत्न झाले.