तीन हॉटेलांवर छापा, पाऊण लाखांचा मद्यसाठा जप्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

नाशिक - तालुक्‍यातील गिरणारे परिसरात असलेल्या तीन हॉटेलांवर छापा टाकून अवैध विक्री होत असलेल्या देशी-विदेशी दारूचा ७७ हजार रुपयांचा साठा जप्त केला. या प्रकरणी तिघांना अटक झाली आहे.

ग्रामीण पोलिसांच्या पथकाने धोंडेगाव रोडवर असलेल्या हॉटेल भगवतीवर छापा टाकला. हॉटेलचालक सुनील निकम (वय ४०, रा. गिरणारे) विनापरवाना देशी-विदेशी मद्यविक्री करीत असताना आढळून आला.

हॉटेलच्या तपासणीत ५७ हजार २०१ रुपयांचा देशी-विदेशी मद्यसाठा सापडला. गिरणारे-धोंडेगाव रोडवरील संजय पटेल (५०, रा. गिरणारे, मूळ रा. सुरत) याच्या हॉटेल ओमसाईवर छापा टाकला. तेथे १६ हजार ८९० रुपयांचा मद्यसाठा सापडला. गिरणारेतील हॉटेल पृथ्वीवरही छापा टाकला. संशयित तानाजी कसबे (३०, रा. गिरणारे) याच्या ताब्यातून तीन हजार ४८६ मद्यसाठा जप्त केला आहे. तिन्ही ठिकाणांहून पोलिसांनी ७७ हजार ५७७ रुपयांचा देशी-विदेशी मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी तिन्ही हॉटेलचालकांना ताब्यात घेतले आहे. नाशिक तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे, उपनिरीक्षक कैलास शिरसाठ, शिपाई संकेत कासार, नितीन महेर, निवृत्ती काळे, अमोल दरवे, चालक योगेश पवार यांनी ही कारवाई केली.  

तालुका पोलिस ठाणे अंधारात
पथकाने या कारवाईची खबरही नाशिक तालुका पोलिस ठाण्याला लागू दिली नाही. कारवाई केल्यानंतरच जप्त केलेला साठा व संशयितांना तालुका पोलिस ठाण्यात हजर करून गुन्हा नोंदविण्यात आला.