मालेगाव: साकुर फाट्याजवळ अपघातात एक ठार

accident
accident

पिलखोड (ता. चाळीसगाव) : येथून तीन किमी अंतरावरील साकुर फाट्याजवळ शनिवारी (ता. 23) सकाळी साडे नऊच्या सुमारास दुचाकी व रिक्षाच्या झालेल्या अपघातात एक ठार तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर मालेगाव येथे उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, साकुर (ता. मालेगाव) येथून तिघे दुचाकीने पिलखोड येथे येत होते. त्यांच्या दुचाकीचा व मालेगावकडून साकुरकडे जाणाऱ्या रिक्षाचा आज सकाळी साडे नऊच्या सुमारास अपघात झाला. यात शाम द्वारकू सोनवणे(वय 35, रा. साकुर ता. मालेगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. तर उर्वरित दोघे(रा. दापोरे, नावे कळू शकली नाहीत) गंभीर जखमी झाले आहेत. 

जखमींना मालेगाव येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तसेच जखमींपैकी एकाचे दोन दिवसांवर लग्न येऊन ठेपले आहे. या घटनेमुळे साकुर व दापोरे परिसर सुन्न झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com