गुणवत्ता यादीच्या विलंबामुळे प्रवेश रखडले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

नाशिक - महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत कृषी शाखेच्या पदवी अभ्याक्रमासाठीची अंतिम गुणवत्ता यादी अद्याप जाहीर केलेली नाही. यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार आतापर्यंत दुसऱ्या फेरीसाठीची प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्यास विलंब होत आहे.

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 15 जूनपासूनच राहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, परभणीतील वसंतराव नाईक मराठा कृषी विद्यापीठ, दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ या चारही विद्यापीठांसाठीची केंद्रिभूत पद्धतीने प्रक्रिया सुरू झालेली आहे. मात्र अद्यापपर्यंत अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली नाही.