खरिपाच्या पेरण्या 19 टक्‍क्‍यांहून अधिक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

नाशिक - खरिपाच्या जिल्ह्यात 19.51 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. त्यात मक्‍याच्या 62 हजार 73 व बाजरीच्या 33 हजार 987 हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. कापसाची 26 हजार 666 हेक्‍टरवर लागवड झाली आहे. 

नाशिक - खरिपाच्या जिल्ह्यात 19.51 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. त्यात मक्‍याच्या 62 हजार 73 व बाजरीच्या 33 हजार 987 हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. कापसाची 26 हजार 666 हेक्‍टरवर लागवड झाली आहे. 

बियाणे बदलाच्या दरानुसार यंदाच्या खरिपासाठी 87 हजार 847 क्विंटल बियाण्यांची आवश्‍यकता असून, 43 हजार 262 क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. जिल्ह्यासाठी दोन लाख 56 हजार 500 टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी दोन लाख सहा हजार 100 टन आवंटन मंजूर झाले आहे. त्यापैकी कंपन्यांनी 72 हजार 197 टन खताचा पुरवठा केला आहे. 32 हजार 246 टन खतांची विक्री झाली असून, सद्यःस्थितीत 39 हजार 951 टन खते उपलब्ध आहे. एसएसपी, एसओपी, अमोनियम सल्फेट ही खते बाजारात विक्रीसाठी उपलब्ध नाहीत. बाजारात 13 हजार 597 युरिया, दोन हजार 213 टन एमओपी, दोन हजार 151 टन डीएपी, 21 हजार 990 टन मिश्र खते विक्रीसाठी शिल्लक आहेत. 

विक्रीसाठी पुरविण्यात आलेली बियाणे क्विंटलमध्ये अशी ः संकरित ज्वारी- 26, संकरित बाजरी- दोन हजार 581, भात- 15 हजार 276, मका- दहा हजार 946, तूर- 121, मूग- 136, उडीद- 43, सोयाबीन- 13 हजार 687, बीटी कापूस- 446. 

भाताची रोपे टाकणे मंदावले 
पावसाने उघडीप दिल्याने आदिवासी भागात भाताच्या लागवडीसाठी रोपे टाकण्याचा वेग मंदावला आहे. 66 हजार 749 हेक्‍टर इतके भाताचे सर्वसाधारण क्षेत्र जिल्ह्यात आहे. त्यातील दहा हेक्‍टरवर भाताची लागवड झाली आहे. ज्वारीच्या पेरणीचा वेग काहीसा संथ आहे. तीन हजार 990 हेक्‍टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी आतापर्यंत 60 हेक्‍टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. एक लाख 60 हजार 219 हेक्‍टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी 33 हजार 987 हेक्‍टरवर बाजरीची पेरणी झाली. मक्‍याचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख 73 हजार 23 हेक्‍टर आहे. तुरीची 310, उदीडची 143, मुगाची 764 हेक्‍टरवर पेरणी, तर भुईमुगाची एक हजार 846, सूर्यफुलाची तीन हेक्‍टरवर लागवड झाली आहे. सोयाबीनची 57 हजार 12 हेक्‍टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी 860 हेक्‍टरवर लागवड झाली आहे. याशिवाय कापसाची 47 हजार 216 हेक्‍टर क्षेत्र आहे. खरिपाचे जिल्ह्यातील सर्वसाधारण क्षेत्र सहा लाख 52 हजार 557 हेक्‍टर असून, प्रत्यक्षात एक लाख 27 हजार 310 हेक्‍टर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात चार हजार 278 हेक्‍टरवर पेरण्या झाल्या.