पाखरांनो, फिरा रे परत..! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

नाशिक - महाराष्ट्राचे भरतपूर असलेल्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात हिवाळ्याची चाहूल लागताच पक्ष्यांचा किलबिलाट वाढलाय. दुसरीकडे मात्र निफाड तालुक्‍यात या भागातील शेतात उभ्या असलेल्या पिकांवर पक्ष्यांनी ताव मारण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर पाखरांनो, फिरा रे परत..! असे म्हणण्याची वेळ आली आहे. पाखरांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी शक्कल लढवून ढोल वाजवण्यास सुरवात केली आहे. 

अभयारण्याजवळ मुकुंद राजोळेंची तीन एकर शेती आहे. त्यात त्यांनी उसाऐवजी भाताची लागवड केली आहे. परतीच्या पावसाने त्यांचे एक एकरावरील पीक डोळ्यादेखत सडून गेले. त्याचा पंचनामा झालेला नाही. आता दोन एकरावरील भात उरला आहे. मात्र, त्यांच्यासमोर नवीन संकट उभे राहिले आहे ते म्हणजे हजारो पक्ष्यांचे थवे भातावर ताव मारण्यासाठी येत आहेत. राजोळे पक्षीप्रेमी आहेत. त्यामुळे त्यांनी हातात गलोर अथवा गोफणला स्पर्श केलेला नाही. त्यांनी पक्ष्यांसाठी काही क्षेत्रावर बाजरी लावली आहे. पण हातचा भात गेल्याने वर्षभर खाण्याचे हाल होतील म्हणून भाताचे रक्षण करण्यासाठी त्यांचे कुटुंब दिवस उजाडला की शेतात असते. कुटुंबातील एक सदस्य सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत शेतात बसून राहतो. पाखरांना हाकलण्यासाठी त्यांनी शेतात चमकीची दोरी बांधली आहे. तसेच पाखरांना हाकलण्यासाठी ते ढोल वाजवतात. 

निफाड तालुक्‍यातील अभयारण्याच्या परिसरात ऊस हे प्रमुख पीक आहे. शिवाय गहू, भात, बाजरी, मक्‍याचे उत्पादन शेतकरी घेतात. सद्यःस्थितीत ही पिके पक्व असल्याने पाखरांसाठी मेजवानी उपलब्ध झाली आहे. अभयारण्यात मुनिया जातीचे हजारो पक्षी आले आहेत. ते समूहाने राहतात. हवेत झोके घेत शेतात दाणे खाण्यासाठी ते समूहाने जातात. एक दाणा खाण्यासाठी पक्ष्यांचे थवे पूर्ण फांदी तोडून ठेवतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीत भर पडते. 

सरकार घोषणा करते; पण प्रत्यक्षात आम्हा शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही. परतीच्या पावसाने भाताचे नुकसान होऊनही पंचनाम्यासाठी कुणीही फिरकले नसल्याने त्याचा पुनर्प्रत्यय आम्हाला आलाय. आता पक्ष्यांचे मोठे थवे यायला सुरवात झाली आहे. पक्षी आमचे मित्र आहेत. मात्र, आमचे पोट भरण्यासाठी त्यांच्यापासून धान्य वाचविणे आवश्‍यक आहे. त्यासाठी लढाई सुरु आहे. 
- मुकुंद राजोळे, शेतकरी 

Web Title: nashik news Agriculture bird farmer