वातानुकूलित बसपोर्टचे आज भूमिपूजन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

नाशिक - मेळा बसस्थानकाच्या जागी एअरपोर्टच्या धर्तीवर राज्यातील पहिले वातानुकूलित बसपोर्ट साकारले जाणार आहे. त्याचे भूमिपूजन आज (ता. ३०) होणार आहे. 

नाशिक - मेळा बसस्थानकाच्या जागी एअरपोर्टच्या धर्तीवर राज्यातील पहिले वातानुकूलित बसपोर्ट साकारले जाणार आहे. त्याचे भूमिपूजन आज (ता. ३०) होणार आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची प्रमुख उपस्थिती असेल. पालकमंत्री गिरीश महाजन, परिवहनमंत्री दिवाकर रावते, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, डॉ. अपूर्व हिरे, डॉ. राहुल आहेर, योगेश घोलप, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, महापौर रंजना भानसी आदी उपस्थित राहतील. मेळा बसस्थानकासाठी आमदार देवयानी फरांदे यांनी निधीची मागणी केली होती. चार कोटी महामार्ग बसस्थानकास व एक कोटीचा निधी मंजूर करण्यात आला. वाढीव निधीसाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मान्यता दिली. परिवहनमंत्री रावतेंनी चौदा कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली. 

एअरपोर्टच्या धर्तीवर राज्यातील पहिले अत्याधुनिक बसपोर्ट राहणार आहे. बसपोर्टच्या माध्यमातून नाशिककरांना निवडणुकीत दिलेला शब्द पाळण्याचा आनंद होत आहे.
- प्रा. देवयानी फरांदे, आमदार