सलाम...मातापित्यांच्या धाडसी निर्णय अन्‌ कणखरतेलाही!

नाशिक रोड - तोफखाना केंद्रात लष्काराकडे आपली मुले सुपूर्त केलेल्या पालकांचा गुरुवारी झालेल्या संचलनाप्रसंगी पदक देऊन गौरविताना मेजर जनरल पी. पी. प्रकाशसिंह.
नाशिक रोड - तोफखाना केंद्रात लष्काराकडे आपली मुले सुपूर्त केलेल्या पालकांचा गुरुवारी झालेल्या संचलनाप्रसंगी पदक देऊन गौरविताना मेजर जनरल पी. पी. प्रकाशसिंह.

नाशिक - आपल्या मुलानं इतरांपेक्षा वेगळं क्षेत्र निवडून "करिअर' करावं, नावलौकिक मिळवावा, असं प्रत्येक पालकाला वाटतं. देशभक्ती व राष्ट्रनिष्ठा मनी बाळगणारे काही पालक तर ठरवूनच मुलांना सैन्यदलात पाठविण्याचा धाडसी निर्णय घेतात. यामागे देशसेवेचे बीज त्यांच्या मनामनात, अंगी रुजावे आणि तो देशभक्ती, सेवेसाठी सदैव तत्पर राहावा एवढाच हेतू असतो...आपले मूल लष्कराला समर्पित करून अशाच कणखर बनलेल्या 471 मातापित्यांचा आज गौरव करण्यात आला. तोफखान्यातील या रंगारंग सोहळ्यात सर्व धर्माच्या धर्मग्रंथांच्या साक्षीने "भारत हाच धर्म आणि देशासाठी बलिदानाची शपथ घेतली.

भारतीय लष्कराला 471 तरुण सुपूर्द करणाऱ्या विविध प्रांतांतील पालकांचा दक्षिण-पश्‍चिम विभागाचे मेजर जनरल पी. पी. प्रकाशसिंह (व्हीएसएम) यांनी विशेष गौरवपदक देऊन सन्मान केला. वर्षाला तीन हजारांवर तोपची घडविणाऱ्या नाशिक रोड तोफखाना केंद्रात 43 आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या या तुकडीने पालकांच्या साक्षीने शानदार संचलन करत सर्वांचेच लक्ष वेधले. संचलनानंतर प्रशिक्षण, ड्रिल, शस्त्र प्रशिक्षण दाखविण्यात आले. विविध क्षेत्रांत विशेष नैपुण्य दाखविणाऱ्या बवंशी मंजुनाथ (संचलन), विकासकुमार (पीटी), विजय बुटाभाई मेवाडा (शस्त्र प्रशिक्षण), हरजितसिंह (बेस्ट गनर), देवेंद्रकुमार शर्मा (टीए), अभिषेक मेथिया (बेस्ट ऑपरेटर), सुरेंद्रकुमार आदी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

माता, भगिनींच्या डोळ्यांतून आनंदाश्रू...
तीन-साडेतीन वर्षांपासून घरापासून दूर असलेल्या मुलाला पाहण्यासाठी अनेकांच्या आई, आजी, बहिणी आतूर होत्या. संचलनानंतर एकसारख्या पोशाखातील गर्दीत प्रत्येक आईच्या नजरेत मुलाला भेटण्याची आस होती. काहींनी गणवेशातील नातवाला पाहून आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. काही बहिणींनाही भावाला पाहून हुंदके दाटून आलेल्या गळ्यात पडून अश्रूंना वाट करून दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com