ऑटोमेशन चेअरमुळे केशकर्तन सोपे

ऑटोमेशन चेअरमुळे केशकर्तन सोपे

नाशिक - केशकर्तनकाराला ग्राहकांना सेवा देत असताना कालांतराने होणाऱ्या व्हेरिकोस व्हेन्ससारखा आजार टाळण्यासाठी संगणक अभियंता तरुणाने ग्राहक आणि केशकर्तनकार दोघांनाही बसून काम करता येईल, अशी खुर्ची (चेअर) बनवली आहे. अभिजित सोनवणे असे खुर्ची बनविणाऱ्या तरुणाचे नाव आहे. 

अभियांत्रिकीचा विद्यार्थी आणि बेअरिंग उद्योगाशी निगडित असल्याने त्याने केशकर्तनकारांच्या कामाचे स्वरूप आणि ग्राहकांची बसण्याची रचना यांचा सातत्याने अभ्यास करून ती खुर्ची प्रत्येक वेळी त्याने केशकर्तनकारांकडे नेऊन त्यात काय कमी आहे, हे जाणून घेतले. दोन महिने वेगवेगळ्या केशकर्तनकारांनी सूचना केल्या. त्याने त्याचे पालन करत खुर्चीत नवनवे तंत्र टाकून तिला वापरात सोपी अशी बनवली. या खुर्चीला त्याने ‘ऑटोमेशन चेअर’ असे नाव दिले. या खुर्चीसाठी अभिजितने पेटंट फाइल केले आहे. 

अशी आहे खुर्ची 
खुर्चीच्या खालून सलग एक रॉड टाकला आहे. ज्यावर ग्राहक आणि केशकर्तनकार बसू शकतात. या रॉडची क्षमता १०० किलो वजनी माणूसही बसू शकेल अशी आहे. खालच्या दोन्ही बाजूला बेअरिंग असल्याने खुर्ची ३६० डिग्रीत फिरू शकते. मात्र, केशकर्तनकाराचे काम प्रामुख्याने एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत अर्थात, १८० डिग्रीतच पूर्ण होते. त्यामुळे ती त्या प्रमाणातही फिरते. तिथेही ग्राहक आणि उभा केशकर्तनकार यांना जेवढी जागा लागेल तेवढीच जागा लागण्यासाठी खुर्ची ॲडजेस्टेबल ठेवली आहे. या संपूर्ण खुर्चीचे वजन १८० किलो आहे. या खुर्चीसाठी विजेचा वापर करावा लागत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com