‘स्वीकृत’ नियुक्तीवरून भाजपमध्ये वादाचे फटाके

‘स्वीकृत’ नियुक्तीवरून भाजपमध्ये वादाचे फटाके

नाशिक - गेल्या सात महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या स्वीकृत नगरसेवकपदांची आज घोषणा झाली खरी, पण भाजप नेत्यांना जी भीती वाटत होती, ती खरी ठरली. ३५ वर्षांपासून भाजपमध्ये महिला आघाडीचे पद सांभाळणाऱ्या सुजाता करजगीकर यांनी शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांच्यावर तोफ डागली असून, स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी व काँग्रेसप्रमाणे घराणेशाही चालवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

महापालिका निवडणुकीच्या वेळी भाजप शहराध्यक्ष सानप यांनी अनेकांना ‘स्वीकृत’साठी आश्‍वासन दिले होते. त्यामुळे महापालिकेत सत्तेत आल्यानंतर स्वीकृतसाठी अनेकांनी इच्छा व्यक्त केली होती. त्यात सुजाता करजगीकर, भारती बागूल व कार्यालयीन सचिव अरुण शेंदुर्णीकर यांची नावेही आघाडीवर होती. 

शिवसेनेने कार्यालयीन सचिव सुनील गोडसे व महिलेला संधी देण्यासाठी ॲड. श्‍यामला दीक्षित यांचे नाव दिल्यानंतर भाजपमध्येही हाच कित्ता गिरविला जाईल, अशी अपेक्षा होती. पण तिघांनाही डावलण्यात आले. माझी आर्थिक परिस्थिती नसल्याने निवडणूक लढवू शकत नाही. त्यामुळे मला स्वीकृत नगरसेवकपद द्यावे, अशी विनंती केली होती. त्या वेळी मान्यही झाली. पण अजिंक्‍य साने यांना सदस्यत्व देऊन काँग्रेसप्रमाणेच भाजपमध्ये घराणेशाही असल्याचा आरोप त्यांनी केला. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com