नाशिक : दिंडोरी तालुक्यात दूध, आंब्याचे ट्रक अडविले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

नाशिक जिल्ह्यातील लखमापूर येथे रात्रीपासूनच शेतकऱ्यांनी सापुतारामार्गे गुजरातला जोडणाऱ्या मार्गावरून होणारी शेतमालाची वाहतूक अडवली. रात्री सूचना देत वाहने सोडण्यात आली. मात्र आज सकाळपासून सुरू असलेली वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली आहे.

लखमापूर (ता. दिंडोरी) : नाशिक जिल्ह्यातील लखमापूर येथे रात्रीपासूनच शेतकऱ्यांनी सापुतारामार्गे गुजरातला जोडणाऱ्या मार्गावरून होणारी शेतमालाची वाहतूक अडवली. रात्री सूचना देत वाहने सोडण्यात आली. मात्र आज सकाळपासून सुरू असलेली वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली आहे.

आज सकाळपासून सुरू असलेली वाहतूक पूर्ण बंद केली असून त्यामुळे आंबे आणि दूधाचे ट्रक अडकून पडले आहेत. दिंडोरी येथे नाशिक-सापुतारा रस्त्यावर पालखेड चौफुलीवर शेकडो शेतकरी जमा होत त्यांनी येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली. यात दोन दुधाचे टॅंकर तर सात-आठ आंब्याचे ट्रक अडवून ते बाजूला लावण्यात आले. तर आंबे, चिक्कू, नारळ आदी विक्रीस जाणारे फळे रस्त्यावर फेकून देण्यात आले. याशिवाय रासेगाव, पांडणे, वणी, खेडगाव, पिंप्री, अचला आदी ठिकाणी भाजीपाला, फळे, दुधाची वाहने रोखण्यात आली आहेत.