लाच प्रकरणातील पोलिस उपनिरीक्षकास कोठडी 

लाच प्रकरणातील पोलिस उपनिरीक्षकास कोठडी 

नाशिक - गुन्ह्याच्या पुरवणी आरोपपत्रामध्ये आरोपी न करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. 

शहरातील बॅंक फसवणूक प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात 5 मार्चला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास होता. गुन्ह्यात साक्षीदार असलेल्या तक्रारदार युवकास पुरवणी दोषारोपत्रात आरोपी न करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे 50 हजार रुपयांची लाच जाधव यांनी मागितली. यामुळे टाकळी रोडवर जाधव यास लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाधव यांच्या घराची झडती घेतली असता त्यात काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जाधव यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली. 

पोलिस विभागाचे नागरिकांना आवाहन 
लाच स्वीकारल्यानंतर रंगेहाथ पकडलेल्या निवांत जाधव यांच्या प्रकरणानंतर पोलिस प्रशासन सतर्क होत त्यांनी पत्रक काढून नागरिकांना जागृत करण्यात आले आहे. जर कोणी पोलिस अधिकारी व कर्मचारी, लिपिक यांनी तपासात सहकार्य करण्याच्या नावाखाली आपल्या पदाचा गैरवापर करत आर्थिक फायद्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पैसे मागत असल्यास यांची कल्पना थेट पोलिस आयुक्तांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले असून, यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन क्रमांक (9762100100)देखील देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com