इन्क्युबेटरच्या कोंडवाड्यातून बालकांची होणार सुटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

नाशिक - जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांचे इन्क्‍युबेटरमध्ये झालेल्या कोंडवाड्याचे वास्तव ‘सकाळ’मधून उजेडात आल्यानंतर हादरलेल्या आरोग्य विभागाने आज अतिरिक्त १४ इन्क्‍युबेटरला तातडीने मंजुरी दिली. आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. अर्चना पाटील यांनी आज जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन नवजात बालकांच्या (एसएनसीयू) कक्षात जादा इन्क्‍युबेटरबाबत जागा निश्‍चित केली. यासाठीच्या प्रशासकीय बाबीसंदर्भात विभागीय आयुक्तांशी चर्चा करून त्याचा पाठपुरावा आरोग्य विभागाकडे तातडीने केला जाईल. ‘लेव्हल थ्री’साठी संदर्भसेवा रुग्णालयाचीही पाहणी करून त्याचाही अहवाल शासनाला लवकरच सादर केला जाणार आहे.
 
एसएनसीयू कक्षात अशी असेल नवीन रचना
     सद्यःस्थितीत एसएनसीयू कक्षातील दोन वॉर्डात १८ इन्क्‍युबेटर आहेत. एका वॉर्डात कांगारू मातांचा कक्ष आहे, तर एका वॉर्डात इन्क्‍युबेटरची गरज नसलेल्या बालकांना मातांसमवेत ठेवले जाते. 
     फेरबदलानुसार, सद्यःस्थितीतील इन्क्‍युबेटर असलेल्या दोन वॉर्डमध्ये नव्याने चार इन्क्‍युबेटर वाढविले जातील. 
     कांगारू माता कक्ष एसएनसीयू कक्षातून प्रसूती विभागात हलविला जाणार आहे. या कक्षात उर्वरित १० पैकी ८ इन्क्‍युबेटरची व्यवस्था केली जाईल. दोन इन्क्‍युबेटर राखीव ठेवले जातील. 
     एसएनसीयू कक्षात १८ इन्क्‍युबेटर नव्याने दाखल होणार असल्याने त्यासाठीचा प्रशिक्षित कर्मचारीवर्गही वाढवावा लागेल. यासाठीचा आकृतिबंध निश्‍चित करून तो जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्तांना सादर केला जाईल.