एप्रिलपासून शहर बससेवा बंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

नाशिक - राज्य परिवहन महामंडळाने शहरात चालविलेल्या जात असलेल्या शहर बस आर्थिक वर्ष संपेपर्यंतच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपासून तोट्याच्या मार्गांवरील बसफेऱ्या बंद करण्याचे धोरण महामंडळाने घेतले असून, सातत्याने बस फेऱ्यांमध्ये कपात सुरू आहे.

सध्या शहर बससेवा चर्चेचा विषय ठरत आहे. राज्य परिवहन महामंडळातर्फे शहरात बससेवा चालविली जाते. दर महिन्याला कोट्यवधी रुपये तोटा होत असल्याचे कारण पुढे करत राज्य परिवहन महामंडळातर्फे बससेवा बंद करण्याचा घाट घातला जात आहे. काही महिन्यांपासून शहर परिसरात सुरू असलेल्या विविध मार्गांवरील बसफेऱ्या बंद केल्या आहेत. 

शहर बसच्या मुद्द्यावरून सामाजिक व विद्यार्थी संघटना आक्रमक होत असताना दुसरीकडे बससेवा बंद करण्याच्या निर्णयावर राज्य परिवहन महामंडळ ठाम आहे. मार्च संपताच एप्रिलपासून शहर बससेवा पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचे समजते. दुसरीकडे महापालिका शहर बससेवा चालविण्यात रस दाखवत नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडण्याची भीती व्यक्‍त होत आहे.  

दरम्यान, एकीकडे संघटनांकडून शहर बस पूर्वपदावर आणण्यासाठी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले जात असताना दुसरीकडे बसफेऱ्या बंद करणे सुरूच आहे.

शहर बससेवा सातत्याने तोट्यात असल्याने तोट्याच्या मार्गावरील बसफेऱ्या बंद केल्या जात आहेत. मार्चनंतर शहर बससेवा पूर्णपणे बंद करण्याचे नियोजित आहे.
- यामिनी जोशी, विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ

दिवाळीपूर्वी ‘शिवशाही’ मिळण्याची शक्‍यता
नाशिक विभागाच्या वाट्याला आलेल्या चार शिवशाही बसगाड्या नागपूरला पळविल्या होत्या. केवळ एक दिवस प्रवासांसाठी या बसगाड्या उपलब्ध होऊ शकल्या. या प्रकारामुळे मनस्ताप व्यक्‍त होत होता. दरम्यान, महामंडळामार्फत दिवाळीपूर्वी  ‘शिवशाही’ बस उपलब्ध होतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

Web Title: nashik news city bus service close