ट्रान्स्पोर्ट असोसिएशनला शहर बससेवेसाठी जागा - आमदार सानप

नाशिक - ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या पदग्रहणप्रसंगी बोलताना आमदार बाळासाहेब सानप.
नाशिक - ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या पदग्रहणप्रसंगी बोलताना आमदार बाळासाहेब सानप.

नाशिक - नाशिक शहर बससेवा सुरू करण्यासाठी ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने पुढाकार घ्यावा. खासगी बससेवेसाठी शहरात २५ एकर जागा उपलब्ध करून देऊ, तसेच वाहतूकदारांचे ट्रक टर्मिनल व वाहतुकीचे प्रश्‍न सोडविण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करू, असे आश्‍वासन आमदार बाळासाहेब सानप यांनी दिले.

नाशिक ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा हॉटेल साई पॅलेसमध्ये झाला. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. महामार्ग पोलिस विभागाचे सुभाष पवार, रोटरी क्‍लबचे अध्यक्ष दिलीपसिंग बेनीवाल, नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रवीण खाबिया, एच. पी. कंपनीचे व्यवस्थापक संजय कुंभारे, बांधकाम व्यावसायिक जयेश ठक्कर, मित्तल लॉजेस्टिकचे महावीर मित्तल, प्रदीप जोहर, सुनील बुरड आदी उपस्थित होते. 

आमदार सानप म्हणाले, की नाशिक ट्रान्स्पोर्ट असोसिएशनला शहरात नाममात्र दरात गाळे देण्यात येतील. शहरात बसमुळे होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी आणि नाशिक बससेवेसाठी कन्नमवार पुलाजवळील २५ एकर जागा देण्यात येईल. वाहतूकदारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न केले जातील. या वेळी श्री. पवार, रोटरी क्‍लबचे अध्यक्ष बेनीवाल, नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष खाबिया, एच. पी. कंपनीचे व्यवस्थापक कुंभार आदींची भाषणे झाली. तत्पूर्वी अध्यक्ष जयपाल शर्मा, वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र फड, सचिव सुभाष जांगडा, राजू लोढा, महेंद्रसिंग राजपूत यांनी पुढील दोन वर्षांसाठी पदभार स्वीकारला. राजकुमार शर्मा यांनी पदाधिकाऱ्यांना शपथ दिली. असोसिएशन शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी आणि शहरात ट्रक टर्मिनल होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष जयपाल शर्मा यांनी सांगितले. वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र फड यांनी प्रास्ताविक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com