औरंगाबादकर यांचा अर्ज दिवाणी न्यायालयाने फेटाळला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

नाशिक - सार्वजनिक वाचनालयाचे मिलिंद जहागीरदार, विनया केळकर, स्वानंद बेदरकर यांचे सभासदत्व रद्द केल्याबाबत तिघांनी दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, दिवाणी न्यायालयाला अशा प्रकारचा खटला चालविण्याचा अधिकार नाही, असा अर्ज औरंगाबादकर यांनी दिला होता. त्यांचा हा अर्ज दिवाणी न्यायालयाने फेटाळून लावला. 

सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांनी तत्कालीन कार्यवाह मिलिंद जहागिरदार, कार्याध्यक्ष विनया केळकर, अर्थसचिव स्वानंद बेदरकर यांचे कार्यकारिणी सदस्यत्व स्थगित करण्याचे आदेश काढले होते. या तिघांनी दाखल केलेल्या दाव्याविरोधात औरंगाबादकर यांनी दिवाणी न्यायालयाला हा दावा चालविण्याचा अधिकारच नाही, असा अर्ज दाखल केला होता. यावर न्यायाधीश राजेश कपाटे यांनी हा दावा सुनावणीचा पूर्ण अधिकार न्यायालयाला आहे, असा आदेश दिला आहे. 

Web Title: nashik news court

टॅग्स