कॅशलोड कंपनीलाच तीन लाखांचा गंडा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

नाशिक - एटीएममध्ये रोकड भरणाऱ्या (कॅशलोड) कंपनीलाच चोरट्याने दूरध्वनी करून ओटीपी क्रमांक मिळविला आणि त्याआधारे एटीएम मशिन उघडून त्यातून तीन लाखांची रोकड चोरून नेली. कंपनीच्या लक्षात ही बाब येताच पोलिसांना कळविल्यानंतर संशयिताला सातपूर परिसरातून अटक करण्यात आली आहे. 

सचिन बाळू निरगुडे (32, रा. पांडुरंग अपार्टमेंट, शिवाजीनगर, सातपूर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. कॅश इन्फोसिस कंपनीचे व्यवस्थापक येशुदास नायडू यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. कॅश इन्फोसिस कंपनीच्या माध्यमातून शहरातील एटीएममध्ये रोकड भररण्याचे काम केले जाते. सचिन निरगुडे याने 7 मे ते 27 ऑगस्ट या कालावधीत व्यवस्थापक नायडू यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. कंपनीचा कामगार असल्याचे भासवून सिडकोतील विजयनगर बसथांबा येथील ऍक्‍सिस बॅंकेचे एटीएम व गंगापूर रोडवरील मातोश्री कॉम्प्लेक्‍समधील एटीएम सेंटरमध्ये रोकड भरण्यासाठी "ओटीपी'ची मागणी केली. व्यवस्थापक नायडू यांनाही तो कर्मचारी असल्याचे वाटले आणि त्यांनी त्यास वेळोवेळी ओटीपी क्रमांक दिला. या ओटीपी क्रमांकाचा वापर करून संशयित निरगुडे याने दोन्ही एटीएममधून 3 लाख 8 हजार 500 रुपयांची रोकड परस्पर काढून घेतली. नंतर निरगुडे कर्मचारी नसल्याचे निदर्शनास आले.